Shivsena MNS Google
नाशिक

नाशिकच्या जुने सिडकोत मनसे-शिवसेनेत निवडणूकपूर्व हिंसाचार

विक्रांत मते

नाशिक : महापालिका निवडणुका जवळ येत असताना निवडणूकपूर्व हिंसाचार वाढीच्या घटना घडत आहे. जुने सिडको विभागात गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारच्या हिंसक घटना शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाढीस लागल्या आहेत. मात्र, या घटना किरकोळ समजून पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. (pre-election-violence-in-mns-shivsena-is-on-the-rise-as-municipal- elections-approach-in-nashik)


पुढील वर्षाच्या सुरवातीला महापालिका सार्वत्रिक निवडणुका होत आहे. निवडणुकीमध्ये विद्यमान नगरसेवकांबरोबरच विरोधी पक्ष, इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, त्या दृष्टीने प्रत्येकाकडून तयारी होत असताना इच्छुक तयार होऊच नये यावरून शह- प्रतिशहची लढाई शहरात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. मात्र, जुने सिडकोमध्ये सुरवातीला किरकोळ वाटणाऱ्या घटना आता स्पर्धक व कार्यकर्त्यांचे एकमेकांवर हल्ल्यात रुपांतरीत होत असल्याचे दिसून येत आहे. या भागात शिवसेना व मनसेची ताकद आहे. या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले असून, प्रभाग सोडून अन्य ठिकाणी दिसेल तसे हल्ले एकमेकांवर होत असल्याने निवडणूकपूर्व वादाने या भागात टोक गाठले आहे. सार्वजनिक सण-उत्सव, मिरवणुका, प्रचाराचे कॅलेंडर वाटप, होर्डिंग लावणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार करणे, गल्ल्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांवर हल्ले होणे, हे प्रकार नित्याचे झाले आहे. निवडणूक जाहीर होईपर्यंत या भागात मोठी घटना घडण्याची भीती येथील नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.


पोलिसांचे दुर्लक्ष

भांडणे, हल्ले करणे ही बाब नित्याची झाल्याने स्थानिक नागरिक, तसेच ज्यांच्यावर हल्ले होत आहे त्यांच्या नातेवाइकांकडून, स्थानिक नागरिकांकडून अंबड व इंदिरानगर पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार देवूनही दखल घेतली जात नाही. पोलिस आयुक्तांपर्यंत येथील घटनांची तक्रार करण्यात आली, मात्र यापूर्वी घडलेल्या एकाही घटनेवर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT