Kalidas Kala Mandir esakal
नाशिक

NMC News : कालिदास कलामंदिरात वातानुकूलित यंत्रणेसाठी दीड कोटी खर्चाची तयारी!

महापालिकेकडून सांस्कृतिक कार्यक्रमांना व्यासपीठ म्हणून कालिदास कलामंदिर नाट्यगृहात मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुख्यस्थान असलेल्या कालिदास कलामंदिरात पुन्हा एकदा वातानुकूलित यंत्रणेसाठी जवळपास दीड कोटींचा खर्च करण्याची तयारी प्रशासनाने केली असून, महासभेवर त्या संदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. (Preparing to spend one half crores for air conditioning system kalidas kalamandir by nmc Nashik News)

महापालिकेकडून सांस्कृतिक कार्यक्रमांना व्यासपीठ म्हणून कालिदास कलामंदिर नाट्यगृहात मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली. महापालिकेत मनसेची सत्ता असताना कलामंदिराची दयनीय अवस्था होती.

त्या वेळी मराठी कलाकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नाट्यगृह दुरुस्तीसाठी साकडे घातले होते. त्यानंतर कालिदास कलामंदिराला ऊर्जितावस्था आली. आठ कोटी रुपये खर्च करून कालिदास कलामंदिर नव्याने तयार करण्यात आले.

कालांतराने तीन कोटींनी खर्च वाढून जवळपास ११ कोटी रुपये नूतनीकरणासाठी खर्च झाले. संगीत व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा बसविणे आरामदायी खुर्च्या या सुधारणा करण्यात आल्या. मात्र कालांतराने नव्याने तयार करण्यात आलेल्या सुविधांबद्दल तक्रारी सुरू झाल्या.

वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने तत्कालीन महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कालिदासचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाने यांना निलंबित केले. त्यानंतर वातानुकूलित यंत्रणा पुन्हा सुस्थितीत आणली गेली.

या यंत्रणेवर खर्च करून वर्ष होत नाही, तोच आता पुन्हा विद्युत विभागाने १ कोटी चाळीस लाख रुपये वातानुकूलित यंत्रणा दुरुस्तीसाठी खर्चाचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रमुख सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Student Protest: भीतीपेक्षा मोठा होता विद्यार्थ्यांचा आवाज! घरच्यांना न सांगता जंतरमंतरवर पोहोचली नम्रता; आंदोलनात झाली सहभागी

Mumbai Rain: मुंबईकरांची जीवनवाहिनी कोलमडली! विरार-डहाणू लोकलसेवा पूर्णतः बंद; प्रवाशांचे हाल

Raj and Uddhav Thackeray: "मोदींना विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो का?"; राज-उद्धवांचा सरकारवर घणाघात, 26 जुलैला मुंबईत मोर्चा

MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

SCROLL FOR NEXT