ZP Nashik latest marathi news esakal
नाशिक

Nashik ZP: शासनादेश डावलून केंद्रप्रमुखांची पदोन्नती! पदवीधरांना विषयनिहाय पदोन्नतीची अध्यापक संघाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून शासनादेश डावलून केंद्रप्रमुखांना पदोन्नती दिल्या जात आहेत, असा आरोप नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक अध्यापक संघाने केला आहे.

शासन निर्णयानुसार अर्थात पदवीधर प्राथमिक शिक्षकांना विषयनिहाय पदोन्नती देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सोमवारी (ता. ७) देण्यात आले. (Promotion of Center chief by canceling the government order Teachers union demand subject wise promotion of graduates Nashik)

संघाच्या शिक्षकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. ‘त्यात नवीन शैक्षणिक धोरणानुसार केंद्रप्रमुख हे पद गुणवत्तावाढीसाठी महत्त्वाचे प्रशासकीय पद आहे.

त्याची पदोन्नती प्रक्रिया शासन नियमानुसार राबविण्यात यावी. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार मंजूर पदांपैकी भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी पदांची विभागणी समप्रमाणात राहील, असे निर्देश आहेत.

शिक्षण संचालकांनीही पदोन्नतीने ४०ः३०ः३० या प्रमाणे भाषा, गणित व समाजशास्त्र माहिती सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. पदोन्नतीसंदर्भात सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागविण्यात आलेल्या मार्गदर्शनातही शासन आदेशाप्रमाणे पदोन्नती केल्याचे नमूद केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नागपूर जिल्हा परिषदेनेही केंद्रप्रमुख पदोन्नती ही शासन आदेशाप्रमाणे केली आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेने देखील सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदोन्नती न करता शासन आदेशाप्रमाणे करावी, अशी मागणी केली आहे.

किरण कापसे, गोविंद पाटील, अनिल बोडके, दीपक खैरनार, प्रशांत कोठावदे, संगीता वानखेडे, प्रशांत शेवाळे, गजानन उदार, अजिनाथ आंधळे, अनिल वाघ, दीपक शेवाळे, वाल्मीक चव्हाण, जयंत जाधव, गणेश बोरसे, गणेश परदेशी आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT