raosaheb danve latest marathi news esakal
नाशिक

पंकजा यांच्या भावनांचा पक्षश्रेष्ठी विचार करतील : रावसाहेब दानवे

विक्रांत मते

नाशिक : शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्री मंडळाच्या यादीत पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी फुंकर घालताना ज्येष्ठ नेते असल्याने त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा पक्षश्रेष्ठी जरूर विचार करतील अशी आशा व्यक्त केली. त्याचबरोबर लवकरच मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (Raosaheb Danve statement about pankaja munde maharashtra political nashik Latest Marathi News)

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकांच्या घरापर्यंत पोहचण्याची मोहीम राबवली जात आहे त्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला आज (ता.१२) भेट दिली.

त्यानंतर भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. राजे मंत्रिमंडळाच्या वतीने १८ मंत्र्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात पंकजा मुंडे यांना स्थान न दिल्याने त्यांनी कदाचित माझी पात्रता नसेल, असे वक्तव्य करून नाराजी व्यक्त केली होती त्या पार्श्वभूमीवर श्री दानवे यांना विचारले असता पंकजा मुंडे पक्षाच्या ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी व्यक्त केलेली अपेक्षा यावर पक्षश्रेष्ठी विचार करतील.

दरम्यान स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्वातंत्र्य सैनिकांच्या घरापर्यंत केंद्रीय मंत्री जात आहेत. भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिल्यानंतर सावरकरांनी ज्या काळ कोठडीत शिक्षा भोगली तेथील दर्शन भगूरच्या ७५ नागरिकांना घडविले जाणार असल्याची माहिती श्री दानवे यांनी दिली.

रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले

- कल्याण-इगतपुरी मेमो रेल्वे संदर्भात माहिती घेणार.

- रेल्वे तोट्यात, एक रुपये पैकी ५५ पैसे सरकारचे.

- सेवा क्षेत्र असल्याने तोटा सहन करावा लागतोय.

- समृद्धी एक्सप्रेस मार्गाने लवकरच बुलेट ट्रेन.

- केंद्र व राज्यात आता समविचारी सरकार .

- महारेलच्या माध्यमातून मुंबई- संभाजीनगर- नागपूर सुपरफास्ट ट्रेनचे नियोजन.

- मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी शिंदे सरकारचे सहा हजार कोटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT