Dhule : देवभाने धरण सलग चौथ्या वर्षी ओसांडले

Devbhane Dam overflowing
Devbhane Dam overflowingesakal

कापडणे (जि. धुळे) : तिसगाव, ढंढाणे, वडेल परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने देवभाने (ता. धुळे) धरण तुडुंब भरुन ओसंडले. देवभाने, धमाणे व कापडणेचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

सलग चौथ्या वर्षी देवभाने, कापडणे व सरवड शिवारातील शेती रब्बीसाठी ओलिताखाली येणार आहे. ऑगस्टमध्येच तलाव व धरणे भरल्याने शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या आहेत. (Devbhane dam overflows for fourth consecutive year dhule Latest marathi news)

सोनवद प्रकल्पही ओव्हर फ्लोच्या मार्गावर

भात नदी, सुकवाय व मधलीवाय नालाही प्रवाहित झाले आहेत. पांझरेचा कालवाही महिनाभरापासून सुरु आहे. पाण्याचा स्रोत वाढल्याने सोनवद प्रकल्प (ता. शिंदखेडा) पंधरा दिवसांत तुडूंब भरण्याची शक्यता वाढली आहे.

धुळे तालुक्यातील पाणीसाठे भरले शंभर टक्के

धुळे तालुक्यात मुकटी, पूरमेपाडा, एमआयडीसी टँक, सोनगीर व निमडाळे तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. आता देवभाने धरणही ओसंडून वाहू लागले आहे. तालुक्यातील जवळपास पंधराही लहानमोठे जलाशय ओसंडले आहेत.

Devbhane Dam overflowing
Nandurbar : परंपरागत नृत्याने परिसर दुमदुमला

अन्यथा असायची अक्कलपाड्यावर भिस्त

साक्री तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानंतर अक्कलपाडा धरण भरायचे. त्यानंतर नकाणे, निमडाळे व गोंदूर तलाव पाटचारी व कालव्याने भरण्यास सुरवात व्हायची. ते भरल्यानंतर अर्ध्या तालुक्याचा पाणी प्रश्न संपुष्टात यायचा. आता प्रथमच वरुणराजाने तालुका अक्कलपाड्याशिवाय जलमय केला आहे.

Devbhane Dam overflowing
रस्तेच खराब; टोल का द्यावा? NCP आक्रमक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com