Reflector mirror to avoid accidents commendable initiative by Kalavala Sankalp Group Nashik News esakal
नाशिक

Nashik News : अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर मिरर! कळवणला संकल्प ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

धोकादायक वळणावर समोरील वाहनाचा अंदाज येत नसल्याने अनेकदा छोटेमोठे अपघात घडत असतात

रवींद्र पगार

कळवण : धोकादायक वळणावर समोरील वाहनाचा अंदाज येत नसल्याने अनेकदा छोटेमोठे अपघात घडत असतात. कळवण शहरासह परिसरातील असे वळणावर होणारे अपघात टाळण्यासाठी कळवणच्या संकल्प ग्रुपने पुढाकार घेतला असून दहापेक्षा अधिक धोकादायक वळणावर रिफ्लेक्टर मिरर ग्रुपतर्फे बसवण्यात आले आहेत.

यामुळे अपघात टाळण्यास मदत होणार आहे. (Reflector mirror to avoid accidents commendable initiative by Kalavala Sankalp Group Nashik News)

कळवण शहराचा विस्तार वेगाने वाढत असून नवीन नागरी वसाहतींसह अनेक भागात दाटीवाटीने घरे आणि जागीच वळणे असल्याने अशा ठिकाणी समोर येणाऱ्या वाहनांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही.

शाळकरी मुले सायकल चालवत असल्याने वाहनचालकाला लक्षात येत नाही. त्यामुळे अनेकदा अशा वळणावर अपघात घडले आहेत. त्यामुळे ते रोखण्यासाठी ग्रुपने पुढाकार घेतला आहे.

यामुळे वळणावर दुसऱ्या बाजूने येणारी वाहने दिसणार असून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. संकल्प ग्रुपच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

येथे बसविले रिफ्लेक्टर मिरर -

संभाजीनगर (गावठाण), जानकाई शाळा कॉर्नर, सप्तशृंगी कॉलनी, स्वामी समर्थ मंदिरामागे, कुलस्वामिनी कॉलनी, गजानन कॉलनी, शाहीर लेन कॉर्नर, बेहडी नदी कॉर्नर, राम मंदिर, गांधी चौक कॉर्नर तसेच आठंबे कॉर्नर, नांदुरी रस्ता. आगामी काळात णकी काही ठिकाणी हे मिरर बसवण्यात येणार आहेत.

अपघात टाळण्यासाठी उपक्रम -

"संकल्प ग्रुपचा उद्देश सामाजिक कार्य करणे असून रिफ्लेक्टर लावल्यामुळे कॉर्नरला समोरून येणारी गाडी दिसेल. अपघात टाळण्यासाठी या आरशांचे नियोजन संकल्प ग्रुपने केले आहे."

- अविनाश पगार, संकल्प ग्रुप, कळवण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT