suicide esakal
नाशिक

नाशिक : प्रियकराचा लग्नास नकार; अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रियकराशी असलेल्या शारीरिक संबंधाची बाब उघड झाली. त्यानंतरही प्रियकराने लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने नैराश्‍यातून आत्महत्या केली. याप्रकरणी संशयित प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, १ जुलैला रात्री आठच्या सुमारास संशयित आदित्य उत्तम भालेराव (२१, रा. जुनी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प) हा अल्पवयीन मुलीसोबत अश्लील अवस्थेमध्ये एका खोलीत आढळून आले होते. याबाबत वडिलांनी जाब विचारला असता, मुलीने संशयित आदित्य लग्न करणार असल्याचे सांगितले. त्या वेळी त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने मुलीशी विवाह करण्यास नकार दिला. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी आदित्यविरुद्ध बलात्कार, पोस्कोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला उपनिरीक्षक टी. एस. पवार पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT