ZP CEO Ashima Mittal, Nashik News esakal
नाशिक

Nashik News: अंबोली प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मृत्यूप्रकरणी अहवाल सादर करावा; ZP CEO यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अंबोली (ता.त्रंबकेश्‍वर) येथील जिल्हा परिषद शाळेत पहिलीची वर्गात शिक्षण घेणारी पूर्वा विलास गवते या सात वर्षीय विद्यार्थिनीचा २० सप्टेंबर रोजी शाळेत मृत्यू झाला. या प्रकरणी तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांना दिले.

त्यानुसार शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी तालुका गटशिक्षणाधिकारी यांना पाठवत चौकशीचे आदेश दिले आहे. शनिवारी (ता.२२) हा अहवाल सादर केला जाणार आहे. (Report to be submitted in Amboli Primary School student death case Instructions from ZP CEO Nashik News)

अंबोली येथील जिल्हा परिषद शाळेत पहिलीची वर्गात शिक्षण घेणारी पूर्वा विलास गवते (वय ७) ही मुलगी शाळेत मधल्या सुटीत जेवण करत असताना अचानक पोटात दुखायला लागले. नाशिक येथे जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता मयत झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

बुधवारी (ता.२०) सकाळी ११ वाजेला शाळेत गेलेली पूर्वा ही चिमुकली दुपारी एकच्या सुमारास जेवण करत असताना तीला उलट्या झाल्या. त्यावेळी तिला बाजूच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तेथे उपचारासाठी दाखल केले होते.

मात्र तोपर्यंत पूर्वाची तब्येत खालावली होती. त्यामुळे तिला तातडीने नाशिक जिल्हा रूग्णालयात पाठविण्याची आवश्यकता होती. परंतु, रुग्णवाहिका वेळात उपलब्ध होऊ शकली नसल्याने पूर्वाची शुद्ध हरपली होती.

पूर्वाला खासगी वाहनाने त्रंबकेश्वर उपजिल्हा रूग्णालयात व तेथून नाशिक येथे जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासले असता ती मयत झाली होती. या प्रकरणाची मित्तल यांनी गंभीर दखल घेत शुक्रवारी (ता.२२) सकाळी तातडीने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणाचा अहवाल सादर करावे अशा सूचना केल्या. त्यानंतर शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी तातडीने पोषण आहारचे संबंधित अधिकारी यांना प्राथमिक चौकशीसाठी शाळेवर पाठविले.

गटशिक्षणाधिकारी यांना शाळेवर जाऊन सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार शुक्रवारी चौकशी झाली असून शनिवारी हा अहवाल सादर केला जाणार असल्याचे बच्छाव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal TMC Politics: पश्चिम बंगालमधील राजकीय भूकंपानंतर भाजपने दिली पहिली प्रतिक्रिया; नवीन गट सत्तेत जाणार का?

Solapur MLC Election : सोलापूर विधान परिषदेत मोठा गेम! काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद; एका सहीमुळे संपूर्ण निवडणूक फिरली? फत्तेपूरकरांनी उच्च न्यायालयात घेतली धाव

Baba Vanga Prediction: शेवटच्या ७ महिन्यात 'हे' लोक होणार मालामाल! बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत; कोणत्या राशींना होणार लाभ?

Karad Bridge Opening : पुणे -कोल्हापूर महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज, कऱ्हाडचा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होण्याची तारीख ठरली

'या' आद्याक्षराने नाव सुरु होणारे लोक असतात स्वतःच्या मर्जीचे मालक ! अत्यंत हुशार आणि श्रीमंत होणारे लोक

SCROLL FOR NEXT