Radhakrishna Game esakal
नाशिक

Legislative Council Elections : नाशिक विभागीय आयुक्तांकडून विधान परिषद निवडणुकीचा आढावा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येत्या ३० जानेवारीला होणाऱ्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीचा आज (ता.९) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पूर्व तयारी आढावा घेतला. (Review of Legislative Council Elections by Nashik Divisional Commissioner nashik news)

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी गंगाधरन डी. (नाशिक), जलज शर्मा (धुळे), महसूल उपायुक्त संजय काटकर, रमेश काळे, उन्मेष महाजन, प्रज्ञा बडे- मिसाळ आदी उपस्थित होते.

दूरदृश्य प्रणालीद्वारे नगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, नंदूरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, तुकाराम हुलावळे उपस्थित होते.

श्री गमे यांनी यावेळी मतपेट्यांची उपलब्धता, मतपत्रिका छपाई याचा आढावा घेतला. तसेच निवडणूक काळातील वाहनाबाबतचे नियोजन, सूक्ष्म निरीक्षक नियुक्त्या, तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेबाबत नियोजन, या बाबतचा आढावा त्यांनी घेतला.

निवडणूक काळात सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Hockey India League : नवनीत कौर आणि जर्मनप्रीत सिंग करणार एसजी पायपर्सचे नेतृत्व; उपकर्णधारांचीही घोषणा

मोठी बातमी! शाळा बंद आंदोलनातही सुरू होत्या २१६२ शाळा; सोलापूर जिल्ह्यातील १७,८०० शिक्षक शाळा बंद आंदोलनासून राहिले दूर

Mumbai Crime: व्हिसा नसताना भारतात आला, 72 लाखांच्या कोकेनसह पोलिसांनी पकडला

Mephedrone Seized : हडपसरमध्ये मेफेड्रोन विक्री करणाऱ्यास अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT