Dhule News : इमारतीवर विनापरवानगी मोबाईल टॉवर! मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून साहित्य जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The municipal team while inspecting the mobile tower being erected without permission on the building on Wadibhokar road in the city.

Dhule News : इमारतीवर विनापरवानगी मोबाईल टॉवर! मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून साहित्य जप्त

धुळे : शहरातील वाडीभोकर रोडवरील एका इमारतीवर विनापरवानगी उभारण्यात येणाऱ्या मोबाईल टॉवरप्रश्‍नी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई करून टॉवरचे साहित्य जप्त केले. (Mobile tower on building without permission Material seized by dhule municipal encroachment removal team Dhule News)

शहरातील देवपूर भागात वाडीभोकर रोडवर श्री. शिरोडे यांच्या आशापुरी या इमारतीवर (सम्राट पिठाच्या गिरणीसमोर) विनापरवानगी इंडस कंपनीच्या मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू असल्याची तक्रार महापालिकेला प्राप्त झाली होती.

या तक्रारीवरून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी (ता. ९) तेथे पाहणी केली. पाहणीदरम्यान पथकाला इमारतीच्या छतावर बांधकाम मजूर तसेच मोबाईल टॉवरचे साहित्य आढळून आले.

याबाबत मोबाईल टॉवर कंपनीच्या प्रतिनिधीला टॉवरच्या परवानगीबाबत विचारणा केली असता त्याने पथकाला योग्य प्रतिसाद दिला नाही. तसेच असमर्थता दर्शविली. त्यामुळे पथकाने मोबाईल टॉवरचे साहित्य जप्त केले.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

हेही वाचा: Nashik Crime News : सिडकोत गावगुंडांचा 2 तरुणांवर हल्ला; पोलिसांचा वचकच शिल्लक नाही!

अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख प्रसाद जाधव, जाकिर बेग, राहुल फुलपगारे, सनी दुर्धळे, मोहन गवळी, शिरीष वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, शहरात यापूर्वीच मोठ्या संख्येने अनधिकृत मोबाईल टॉवर उभे राहिले आहेत.

या टॉवर्सबाबत महापालिकेने कठोर कारवाई केली नसल्याचेच पाहायला मिळाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आजही अनधिकृतरीत्या टॉवर उभे करण्याचे प्रकार सुरू आहेत.

तक्रार आली नाही तर असे टॉवर्स बिनदिक्कतपणे सुरू राहतात. मोबाईल टॉवर्सच्या करवसुलीचा प्रश्‍नही मोठा आहे. त्याबाबतही महापालिकेकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही.

हेही वाचा: Angarki Chaturthi 2023 | उपासकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती देणारी अंगारिका : डॉ. धारणे