Crime sakal
नाशिक

घाणेगावात दोन गटात हाणामारी; १२ जणांविरूद्ध दंगलीचा गुन्हा

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : घाणेगाव (ता. मालेगाव) येथे मागील भांडणाची कुरापत व चुलत्याला मारहाण का केली, याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. मारहाणीत दोघे जण जखमी झाले. तालुका पोलिस ठाण्यात विनोद सोनवणे व धृपदाबाई काथेपुरी यांच्या परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील बारा जणांविरुद्ध मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विनोद सोनवणे याने दिलेल्या तक्रारीवरून पित्याला मारहाण का केली, याचा जाब विचारला असता त्याचा राग आल्याने वाल्मिक काथेपुरी, ऋषिकेश काथेपुरी, धृपदाबाई काथेपुरी, मनीषा काथेपुरी, मनोज काथेपुरी, दौलत काथेपुरी (सर्व रा. घाणेगाव) यांनी वीट, काठी, लाथाबुक्क्यांनी आपणाला व चुलते रामदास सोनवणे यांना जबर मारहाण केली. मारहाणीत चुलते सोनवणे जखमी झाले. आपले डोके फुटले, असे तक्रारीत म्हटले आहे. याउलट धृपदाबाई काथेपुरी यांनी दिलेल्या तक्रारीत मागील भांडणाची कुरापत काढून विनोद सोनवणे, आबा सोनवणे, देवा सोनवणे, दादु सोनवणे, विकास सोनवणे, भारती सोनवणे यांनी आपल्यासह मुलगा वाल्मिकला काठीने, दगडाने तसेच सून व नातवाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल केले असून, जमादार राजपूत तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायपालिकेचे रक्त सांडले, हा सुनियोजित डाव; CJI Suryakant यांचे धक्कादायक वक्तव्य, NCERT वाद पेटला! सरकारचे वकील स्तब्ध!

Luxury Car Fraud Case : माजी महापौरांचे 'मायाजाळ'! ३८ लाखांत ६८ लाखांची कार देण्याचं आमिष आणि घातला १४ लाखांचा गंडा; वाचा कोल्हेंनी मुंबईत कसा रचला होता सापळा?

Viral Video : बॉसने टेबलवर ठेवले नोटांचे ढीग, कर्मचाऱ्यांना म्हणाला- जितके नेता येतील तितके न्या; कंपनीच्या अनोख्या बोनसचा व्हिडिओ व्हायरल

March Bank Holiday : मार्चमध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद! तुमच्या शहरात कधी राहणार सुट्टी; पाहा संपूर्ण यादी

मालिकेचं शूटिंग संपलं! आता निरोप घेतो.... अभिनेत्याने शेअर केले सेटवरचे शेवटचे फोटो; भावुक होत म्हणाला-

SCROLL FOR NEXT