crime esakal
नाशिक

Nashik Crime News : मालेगावात तरूणांच्या 2 गटात दंगल; 5 जणांना अटक

शहरातील आझादनगर भागातील नांदेडी हायस्कूल मैदानावर दोन गटात गंभीर हाणामारी व दंगल झाली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरातील आझादनगर भागातील नांदेडी हायस्कूल मैदानावर दोन गटात गंभीर हाणामारी व दंगल झाली. मारहाणीत गावठी कट्टा, चाकू, बॅट आदींचा वापर झाल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले.

आझादनगर पोलिस ठाण्यात अफजल शेख हनीफ (२२, रा. नया आझादनगर) व सुलेमान उस्मान गणी शेख (३३, रा. गयासनगर, नांदेडी हायस्कूलसमोर) यांच्या परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन गटातील १४ जणांविरुद्ध दंगल, हाणामारीचा, शस्त्रास्त्र कायदा व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. (Riot in 2 groups of youth in Malegaon 5 people arrested nashik crime news)

अफजल शेख हनिफ याने दिलेल्या तक्रारीत अफजल व त्याचा मित्र तौसिफ मोहम्मद हसन व तौसिफचे मामा अलाउद्दीन हे फिरोज वहाब शेख (३६, रा. जमहुर कॉलनी) याच्याकडे पैशांबाबत विचारणा करण्यासाठी नांदेडी हायस्कूलच्या मैदानावर गेले. फिरोज वहाब याला अलाउद्दीन यांनी विचारणा केली.

त्याचा राग आल्याने व मागील झालेल्या भांडणाची कुरापत काढून अन्य सहा जणांना बोलावून शिवीगाळ केली. फिरोजने चाकूने अफजलच्या डोक्यात मारुन दुखापत केली. शेख सुलेमान उस्मान गणी (३३, रा. गयासनगर) याने गावठी कट्टा (पिस्तूल) बाहेर काढून अफजल व अलाउद्दीन यांच्या दिशेने ताणली.

अनिस अहमद मोहम्मद हुसेन व त्याच्या समवेत असलेल्या तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अफजलला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. १ फेब्रुवारीला दुपारी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. अफजल शेख याच्या तक्रारीवरून आझादनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. अन्य तिघा संशयितांचा शोध सुरु आहे. त्यांच्याविरुद्ध दंगल, शस्त्रास्त्र कायदा व जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सुलेमान उस्मान गणी शेखने दिलेल्या तक्रारीवरून सुलेमान व त्याच्या मित्रांनी त्यांच्यात झालेला जुना वाद मिटवला होता. त्याची कुरापत काढून दानिश याने हत्याराने वार केला. तो चुकवून सुलेमान पळत असताना शारीक याने बॅटने उजव्या हाताच्या पंजावर मारहाण केली.

हयात शेख शकील (२३, रा. इस्लामाबाद) व अफजल शेख हानिफ (२३, रा. नया आझादनगर) ऊर्फ बबलू हा शारीक, आसिफ मल्या याच्या सोबत अलेल्या दोन जणांनी सुलेमान व मित्र फिरोज वहाब शेख यांना मारहाण व शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी सुलेमान हुसेनच्या तक्रारीवरून दानिश, शारीक, हयात शेख शकील, अफजल शेख हनिफ, आसिफ मल्या व अन्य तीन (नावे समजू शकली नाहीत) अशा आठ जणांविरुद्ध मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारीक व हयात शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे. दंगलीची माहिती मिळताच सहाय्यक अधिक्षक तेजबीरसिंग संधू, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप उपनिरीक्षक एस. टी. विधाते व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक विधाते, पोलिस नाईक पगारे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT