road Stop on samruddhi mahamarg of farmers of Sinnar for water of Nilwande nashik news esakal
नाशिक

Nashik Farmer Protest: निळवंडेच्या पाण्यासाठी सिन्नरच्या शेतकऱ्यांचा समृद्धीवर रास्ता रोको

अजित देसाई

Nashik Farmer Protest : अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातील पाणी सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना मिळावे या मागणीसाठी आज मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सिन्नरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. (road Stop on samruddhi mahamarg of farmers of Sinnar for water of Nilwande nashik news)

अहमदनगर जिल्ह्यातील देवकवठे, सिन्नर तालुक्यातील मलढोन, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द पाथरे बुद्रुक व वारेगाव येथील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. जलसंपदा विभागाने सिन्नर तालुक्यातील गावांसाठी नदी मार्गाने पाणी सोडले होते. मात्र हे आवर्तन पाथरे वारेगाव पर्यंत देण्याची शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. तालुका यावर्षी दुष्काळाचा सामना करतो आहे.

निळवंडे च्या पाण्यामुळे किमान पूर्व भागातील जनावरांचा व काही अंशी शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल यामुळे शेतकरी आवर्तनासाठी आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सायाळे शिवारात शेकडोच्या संख्येने एकत्र येत शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावरची वाहतूक रोखून धरली.

सव्वाशे ते दीडशे शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. सकाळी सव्वा अकरा ते सव्वा बारा दरम्यान रास्ता रोको करण्यात आला. नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून वावी पोलिसांच्या मदतीला सिन्नर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कुमक पाठवण्यात आली. तसेच दंगा नियंत्रण पथकाची विशेष प्लाटून देखील आंदोलन स्थळी दाखल झाली होती.

या आंदोलनाची नाशिकचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती देण्यात आली. निळवंडे प्रकल्पाचे व जलसंपदा विभागाचे अधिकारी आंदोलन स्थळी आल्यावर झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्ग सोडला.

वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना व शेतकऱ्यांना समन्वयातून मार्ग काढावा, महामार्गावरची वाहतूक रोखून धरू नये असे आवाहन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT