nashik lockdown esakal
नाशिक

नाशिकमध्ये लॉकडाऊनची वेळ बदलल्याची अफवा! चर्चेला उधाण

युनूस शेख

नाशिक : कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाकडून सर्व आस्थापना आणि नागरिकांसाठी देण्यात आलेली दुपारी चारपर्यंतची वेळ कमी करून दोनपर्यंत करण्यात आली, अशी अफवा शहरात पसरल्याने रविवारी (ता. २७) दिवसभर याबाबत नागरिकांमध्ये चर्चेस उधाण आले होते. (Rumors-of-change-of-time-nashik-city-marathi-news)

अफवेने शहरात चर्चेला उधाण

कोरोनासंदर्भातील कुठलेही वृत्त नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील एक भाग झाले आहे, मग ते वृत्त खरे असो वा खोटे दिवसभर त्यावर चर्चा सुरू असते. असाच काहीसा प्रकार रविवारी दिवसभर सुरू असल्याचे दिसून आले. सोशल मीडियाच्या काही ग्रुपवर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व आस्थापना उघड्या ठेवण्यासाठी व नागरिकांना खरेदीसाठी दुपारी चारपर्यंतची वेळ दिली होती. त्यात बदल करून दुपारी दोनपर्यंत वेळ करण्यात आल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावरून नागरिकांसह दुकानदारांमध्ये चलबिचल सुरू झाली. रविवारी दिवसभर नागरिकांसह दुकानदारांमध्ये वेळेत बदल झाल्याची चर्चा सुरू होती. वृत्त खरे आहे की खोटे हे जाणून घेण्यासाठी एकमेकांना, प्रशासकीय आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करून खात्री करून घेण्यात येत होती. अशा प्रकारची कुठलीही सूचना प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याची खात्री होताच त्यांच्यात समाधान व्यक्त करण्यात आले. व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने महिनाभरापूर्वी दिली होती. त्यानंतर लगेचच पुन्हा वेळ कमी करण्यात आल्याच्या अफवेने व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. मात्र अशी कुठली गोष्ट नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.


कर्मचाऱ्यांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ

मॉलचालकांमध्ये मात्र नाराजी दिसून आली. मॉल उघडे करण्यास अवघे चार ते पाच दिवस झाले होते. सोमवारपासून लगेचच मॉल बंद करण्याच्या सूचना आल्याने मॉलमधील व्यावसायिक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ आली आहे. दुसरीकडे शनिवारी, रविवारी व लग्नसोहळेही बंद करण्याचे आदेश आल्याने नागरिक, लॉन्स, मंगल कार्यालय चालकांनीही नाराजी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघ २ बदलांसह उतरणार; झिम्बाब्वेविरुद्धच्या Playing XI मध्ये स्टार खेळाडू परतले, कोणाचा पत्ता झाला कट ?

Indian Railways Digital Initiative : भारतीय रेल्वेने उचललं मोठं डिजिटल पाऊल!, ‘रेल टेक पोर्टल’ अन् ‘ई-आरसीटी’ प्रणाली सुरू

Latest Marathi News Live Update : पुढच्या वेळी आदित्य ठाकरेंना दावोसला नेतो - फडणवीस

SCROLL FOR NEXT