Bus Stop
Bus Stop esakal
नाशिक

SAKAL Impact: मांगीतुंगीसह पिंपळकोठे अन दसवेल फाट्यावर एसटी बसगाड्यांना थांबा; उत्पन्न वाढीला मदत

सकाळ वृत्तसेवा

अंतापूर : मांगीतुंगी, पिंपळकोठे, दसवेल फाट्यावर परिवहन विभागाच्या जलद, अतिजलद बसगाड्यांना थांबा मिळाल्याने प्रवाशांसह भाविकांची सोय झाली. ‘सकाळ' मध्ये १७ नोव्हेंबरला थांब्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री बिंदू शर्मा यांनी त्याची दखल घेत सटाणाचे आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे आणि नाशिकचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांच्याकडे पत्रव्यवहार केला. (SAKAL Impact Stop ST buses at Pimpalkothe ​​an Dasvel junction with Mangitungi Help increase income nashik)

मांगीतुंगीच्या श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्रामध्ये दररोज देशभरातून मोठ्याप्रमाणात भाविक येतात. शिवाय मांगीतुंगी फाटा परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार यांना या ठिकाणी थांबा नसल्याने रात्री, पहाटे अडचण येत होती.

याबाबत श्री. शर्मा व पिंपळकोठे येथील मूळ रहिवासी आगार व्यवस्थापक अहिरे यांनी जैन समाज, स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला.

श्री. सिया यांनी नंदुरबार, साक्री, नवापूर, अक्कलकुवा, पालघर, सफाळे, शहापूर, कल्याण, इगतपुरी आदी बसस्थानकातील या ठिकाणाहून जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना थांबा दिला.

अनेक वर्षापासूनची मागणी मार्गी लागल्याने श्री. शर्मा व श्री. अहिरे यांचा मांगीतुंगीच्या श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्रातर्फे सत्कार करण्यात आला.

डॉ. सूरजमल जैन, भगवान ऋषभ देव १०८ मूर्ती निर्माण समितीचे अभियंता सी. आर. पाटील, वनविभागाचे निवृत्त अधिकारी शिवाजी अहिरे, दसवेलचे सुभाष पवार, राजेंद्र निकम, प्रवीण पवार, काळू पवार, समाधान निकम, भीलवाडच्या सरपंच सखुबाई ठाकरे, उपसरपंच दोधू ठाकरे, एकनाथ पवार, पिंपळकोठेचे माजी सरपंच किशोर भामरे यावेळी उपस्थित होते.

मांगीतुंगी फाट्यावर प्रवासी निवारासह स्वच्छतागृह व्हावे यासाठी वरिष्ठ पातळीवर संपर्क करण्यात येईल, असे श्री. शर्मा यांनी सांगितले.

"मांगीतुंगी फाट्यावर जलद, अतिजलद बसगाड्यांसाठी थांबा सुरू झाला आहे. प्रवाशांनी वैयक्तिक सुरक्षेच्यादृष्टीकोनातून बसगाडीतून प्रवास करावा. त्यामुळे परिवहन विभागाच्या उत्पन्नात आर्थिक भर पडणार आहे."- राजेंद्र अहिरे (आगार व्यवस्थापक, सटाणा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaydutt Kshirsagar : बीडच्या काका-पुतण्याचा वाद मिटला? जयदत्त क्षीरसागरांच्या मंचावर आमदार संदीप क्षीरसागरांच्या वडिलांची उपस्थिती

Salman Khan: बिश्नोई गँगच्या नावानं पुन्हा सलमानला जीवे मारण्याची धमकी; 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक

Manoj Jarange : ''कोण येतंय कोण नाही, याच्यावर आमचं लक्ष'' मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

Vastu Tips: बाथरूममध्ये ठेवलेल्या 'या' वस्तू वाढवतात नकारात्मकता, आजच काढा बाहेर

India Head Coach : मुहूर्त ठरला तर मग.... गौतम गंभीर 'या' दिवशी सांभाळणार टीम इंडियाच्या कोचचा पदभार, BCCI करणार घोषणा

SCROLL FOR NEXT