Scrap rickshaws  Sakal
नाशिक

स्क्रॅप रिक्षा ठरल्या उपजीविकेचे साधन; अनेकांना मिळाला रोजगार

युनूस शेख

जुने नाशिक : कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार गेले, उपासमारीची वेळ आली. अशा बेरोजगारांना रोजगाराची संधी देत त्यांना आधार देण्यात स्क्रॅप (मोडकळीस) आलेल्या रिक्षा महत्त्वाचा घटक ठरल्या. शहरातील शेकडो जणांना या माध्यमातून स्वतःचा रोजगार उपलब्ध झाला आहे.

गेल्या दीड वर्षापासून शहरात कोरोना प्रादुर्भावाचे संकट घोंघावत आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना कर्ज काढावे लागले. त्यातून उदरनिर्वाहाचा काही दिवसांचा प्रश्न सुटला. परंतु भविष्यात वाट्याला येणारी उपासमारी आणि घेतलेले कर्ज कसे फेडावे. चिंतेने व्याकूळ झालेले निराधारांना आधार देत स्वयंरोजगार उपलब्ध करण्याची संधी मिळाली, ती स्क्रॅप रिक्षामुळे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून अनेक रिक्षांचे परवाने रद्द करून त्यांना स्क्रॅप घोषित केले आहे. त्या रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी बंद झाल्याने त्यांच्या मालकांना केवळ त्या रिक्षा भंगारमध्ये विकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. त्यात टाकाऊपासून टिकाऊ अर्थात उपजीविकेचे साधन बनविण्याचा अनेक मालकांनी विचार केला. रिक्षा मागील बाजूस लाकडी, तसेच लोखंडी ट्रे बनवून दुकानाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या माध्यमातून भाजीपाला फळे, कपडे विक्री रसवंतीगृह अशा विविध व्यवसायांसाठी वापर करण्यात आला. त्यातून स्वतःचा रोजगार निर्माण करण्यास मदत झाल्याने केवळ स्क्रॅप रिक्षा मालकांनी मार्ग अवलंबला असे नाही. गरजू स्लम भागात राहणारे ज्येष्ठ, तरुण यांनीदेखील भंगारातून स्क्रॅप रिक्षा घेऊन त्यास दुकानाचे स्वरूप देत कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन केले. अशाप्रकारे स्वतःचा रोजगार झाल्याने कुणावरही अवलंबून राहण्याची वेळ येत नसल्याने समाधान वाटत आहे. भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटांना देखील तोंड देणे या माध्यमातून काहीसे सोयीचे होणार आहे, अशा प्रतिक्रिया रोजगार उपलब्ध झालेल्यांनी दिल्या.

कोरोनाकाळात रोजगार गेल्यानंतर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळेस स्वतःचा रोजगार निर्माण करण्यास स्क्रॅप रिक्षाचा आधार झाला. त्यामाध्यमातून सध्या भाजीपाला विक्री करून रोजीरोटी चालवली जात आहे. अन्यथा उपासमारीची वेळ आली असती.

- रफिक अन्सारी, भाजीपाला, फळ विक्रेता)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT