..आमच्याच पोटावर पाय का? भाजी विक्रेत्यांचा प्रशासनाला सवाल

vegetable sellers
vegetable sellers sakal

पंचवटी (नाशिक) : प्रशासनाने एकीकडे मॉल, बारसह संघटित असलेल्या मोठ्या व्यावसायिकांना व्यवसायास परवानगी दिली आहे, दुसरीकडे हातावर पोट असलेल्या भाजी विक्रेत्यांबाबत दुजाभाव सुरू असल्याने सर्वकाही सुरू आहे. मग आमच्याच पोटावर पाय का, असा सवाल गंगाघाटावर दर बुधवारी भरणाऱ्या आठवडे बाजारातील विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे.


गाडगे महाराज पूल परिसरातील गंगाघाटाच्या दुतर्फा दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. याठिकाणी आसपासच्या गावातील शेतकऱ्यांसह छोटे व्यावसायिक भाजीपाला विक्रीतून आपला उदरनिर्वाह चालवितात. मात्र, कोरोनाच्या भीतीने प्रशासनाने गत वर्षीपासून या बाजारावर बंदी आणली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. एकीकडे संघटित असलेल्या मॉल, बारसह मोठ्या व्यावसायिकांना व्यवसायाला परवानगी देण्यात आलेली असताना आठवडे बाजाराबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. मात्र, याही परिस्थितीत अनेक विक्रेते आठवडे बाजारात दाखल झाले आहेत. त्यातील काहींना बोलते केले असता त्यांनी संतप्त होत कुटुंबीयांसह आम्ही जगायचे कसे, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

vegetable sellers
नाशिक विभागात २७८ हत्तीरोग रुग्ण; ३१ ऑगस्टपर्यंत दुरीकरण मोहीम


उपनगरांतील बाजार सुरूच

कधीकाळी केवळ गंगाघाटावर भरणारा आठवडे बाजार आता कोणार्क नगर, म्हसरूळ, निलगिरी बाग अशा अनेक भागात सुरू आहे. मात्र, गंगाघाटावरील व्यवसायाला अद्यापही हिरवा कंदील नसल्याने काही मोजकेच विक्रेते बुधवारी माल विक्रीसाठी आणतात. प्रशासनाचा जर उपनगरांतील बाजाराला विरोध नाही, तर केवळ गंगाघाटावर व्यवसाय करणाऱ्यांवर अन्याय का, असा प्रश्‍न हे विक्रेते करतात. कोणार्क नगर परिसरातील श्रीरामनगर भागात आठवड्यातून एकदा नव्हे तर दोन वेळेस बाजार भरतो, परंतु प्रशासन त्याकडे काणाडोळा करते, याकडे काही विक्रेत्यांनी लक्ष वेधले आहे.


गंगाघाटावरील आठवडे बाजाराला जुनी परंपरा आहे. याठिकाणी व्यवसाय करून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु, मनपा प्रशासन दुय्यम दर्जाची वागणूक देत माल जप्त करण्याची भीती घालतात, त्यामुळे जगावे कसे हा प्रश्‍नच आहे.
- मधुकर महाले, शेतकरी, आडगाव

प्रशासनाने एकीकडे दारूच्या दुकानांसह मोठ- मोठ्या मॉलला व्यवसाय करण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र, हातावर पोट असलेल्या भाजी विक्रेते संघटित नसल्याने व्यवसायाला आडकाठी आणली जाते, हे योग्य नाही.
- गणेश पाटील, भाजी विक्रेता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com