Leopard caged in Gangawadi area esakal
नाशिक

Nashik Leopard News: 7 दिवसांत दुसरा बिबट्या जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Leopard News : येथील गंगावाडी परिसरातील शेतात दुसऱ्यांदा लावलेल्या पिंजऱ्यात पुन्हा एक बिबट्या जेरबंद झाला. अजूनही येथे दोन बिबट्यांचा वावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गंगावाडी एकलहरे येथे सात दिवसांपूर्वीच एक नर बिबट्या पिंजऱ्यात अडकला होता आणि बुधवारी (ता. १३) पहाटे त्याच शेतात लावलेल्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या जेरबंद झाला. (Second leopard jailed in 7 days Nashik News)

मंगळवारी दुपारी नीलेश धनवटे यांच्या मळ्यातील बाळू सातपुते हा शेतमजूर उसाच्या शेतात पाणी भरत असताना बांधाजवळ बिबट्या बसलेला दिसला. बिबट्याने सातपुते यांना पाहून गुरगुरण्यास सुरवात केली.

त्यांनी सावध होत हातात काठी घेऊन आरडाओरड करण्यास सुरवात केली असता बिबट्याने धूम ठोकली. हाच नर जातीचा अंदाजे नऊ वर्षांचा बिबट्या पहाटे पिंजऱ्यात अडकला.

शेतकऱ्यांनी पुन्हा केलेल्या मागणीवरून वन परीक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली धनवटे यांच्या शेतात दोन दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर बिबट्याच्या डरकाळ्या ऐकून शेतकऱ्यांनी धनवटे मळ्याकडे धाव घेतली. वन विभागाला कळविल्यानंतर अधिकारी विजयसिंग पाटील, कर्मचारी अशोक, पांडू भोये आदींनी बिबट्याला रेस्क्यू करून रोपवाटिकेत वैद्यकीय तपासणीसाठी रवाना केले.

अजूनही दोन बिबट्यांचा वावर असल्याने सायंकाळ नंतर दहशतीचे वातावरण आहे. पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी शरद धनवटे, तुकाराम धनवटे, योगेश वावरे, दुलाजी शिंदे, माणिक धनवटे, अंबादास वावरे, उत्तम धनवटे, विशाल धनवटे, शशिकांत भोज, सोमनाथ वावरे व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT