Leopard News : बिबट्या-मानव संघर्ष! कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, अत्याधुनिक साधने द्यावीत; नागरिकांच्या अपेक्षा

 Leopard News : बिबट्या-मानव संघर्ष! कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, अत्याधुनिक साधने द्यावीत; नागरिकांच्या अपेक्षा
esakal

Nandurbar News : तळोदा वनक्षेत्रात बिबट्यांची संख्या प्रचंड वाढली आहे आणि त्यातून त्यांचे विविध प्राण्यांवर विशेषतः मानवावर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वांमध्येच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर सुस्त तळोदा वन विभागाने आता चुस्त-दुरुस्त होत योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, बिबट्यांसाठी सातपुड्याच्या पट्ट्यात नैसर्गिक अधिवास तयार करावा आणि आपल्या कर्मचाऱ्यांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण द्यावे.

तसेच शासनानेदेखील परिस्थिती लक्षात घेता तळोदा वन विभागाला अत्याधुनिक साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे. (Citizens expect that employees should be given training and modern tools for leopard attack nandurbar news)

तळोद्यात दिवसेंदिवस मानव-बिबट्या यांच्यामधील संघर्ष वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत बिबट्यांच्या वावर जास्त असणाऱ्या गावांमध्ये वन विभागाने नागरिकांची जनजागृती करण्यासोबतच आवश्यक त्या उपाययोजनेची लवकर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्या दिसल्यास किंवा एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी काय करावे याबाबत गावांमधील मुख्य चौकात माहितीफलक व त्यावर चित्रस्वरूपात नागरिकांना माहिती देणे आवश्यक झाले आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे

सध्याची परिस्थिती बघता बिबट्या एखाद्या वस्तीमध्ये घुसला तर त्याला जेरबंद करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात किंवा त्याला तेथून हुसकावून लावण्यासाठी तसेच एखादा आणीबाणीच्या प्रसंगी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत तळोदा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्याचप्रमाणे बिबट्या व इतर हिंस्र प्राण्यांना जेरबंद करण्यासाठी तळोदा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देणेसुद्धा आवश्यक झाले आहे.

पिंजरा प्रक्रिया सुलभ करावी

काही प्रसंगी बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावणे आवश्यक होते. मात्र पिंजरा लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी घ्यावी लागते आणि ही पद्धत अत्यंत वेळखाऊ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्या पद्धतीत बदल करून स्थानिक अधिकाऱ्यांना प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन पिंजरे लावण्याची परवानगी द्यावी. तसेच बिबट्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता, पिंजऱ्यांची संख्यादेखील वाढवावी, असे यानिमित्ताने बोलले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 Leopard News : बिबट्या-मानव संघर्ष! कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, अत्याधुनिक साधने द्यावीत; नागरिकांच्या अपेक्षा
Leopard : शेतकऱ्याने शेतपिकाला लावलेल्या जाळीत अडकला बिबटया

नैसर्गिक अधिवास तयार करावा

अनेक वर्षांपूर्वी सातपुड्याचे जंगल बिबटे व इतर प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास होते. कालांतराने जंगल मोठ्या प्रमाणात नाहीसे झाले आणि हळूहळू बिबट्यांचा अधिवास परिसरातील ऊस, केळी आदी शेतीचा भाग बनला.

तसेच बिबट्यांना जंगलापेक्षा या भागात मुबलक पाणी व अन्न उपलब्ध झाल्याने, त्यांना हाच परिसर आता आपला अधिवास वाटतो. त्यामुळे मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी सातपुड्याच्या पट्ट्यात बिबट्यांसाठी पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवास तयार करणे आवश्यक झाल्याचे बोलले जाते.

भुलीसाठी बंदुकीचा वापर करावा

बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी आता जीपीएस प्रणालीवर आधारित अत्याधुनिक बंदुकीचा वापर होतो. बंदुकीचा वापर करून दोनशे ते तीनशे फूट अंतरातील बिबट्यावर डार्ट मारून बेशुद्ध करता येते. बिबट्याच्या शरीरात भुलीच्या इंजेक्शनचा डार्ट घुसला आणि बिबट्या पळून जंगलात किंवा शेतात जरी गेला तरी जीपीएसमुळे त्याचे लोकेशन तातडीने कळू शकते.

तसेच जीपीएस लोकेशनसाठी सॅटेलाइट अँटेना किटचा वापर करावा लागतो. सध्याची परिस्थिती लक्षात घेता तळोदा वन विभागाने जीपीएस प्रणालीवर चालणारी बंदूक व सॅटेलाइट अँटेना खरेदी करावा आणि त्यासाठी एका तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी, जेणेकरून यापुढील काळात अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून बिबट्यांना बेशुद्ध करणे आणि सुरक्षितपणे पकडणे सोयीचे होईल.

 Leopard News : बिबट्या-मानव संघर्ष! कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, अत्याधुनिक साधने द्यावीत; नागरिकांच्या अपेक्षा
Nashik Leopard News: बिबट्याकडून पाळीव कुत्र्याचा फडशा; कुंदेवाडीतील घटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com