sanjay raut esakal
नाशिक

नाशिक : 'त्या' शिवसेना कार्यकर्त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

विक्रांत मते

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर महाराष्ट्रभर सेना आणि भाजप (shivsena and bjp) कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी नाशिकमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या कार्यकर्त्यांचा शोध नाशिक पोलीस घेत होते. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर या कार्यकर्त्यांच्या अटकपूर्व जामीनासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं संजय राऊत काल (ता.२७) सांगितलं होतं. त्यानंतर भाजपा कार्यालयात हल्लाप्रकरणी शिवसेना नगरसेवक दीपक दातीर आणि बाळा दराडे यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

भाजपा वर्तुळात अस्वस्थता

भाजपा कार्यालयात हल्लाप्रकरणी शिवसेना नगरसेवक दीपक दातीर आणि बाळा दराडे यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. संशयितांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने भाजपा वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सेशन कोर्टाने ३० ऑगस्टपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी 30 तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे. राऊत यांच्या अचानक ठरलेल्या नाशिक दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून सेना-भाजपातील राड्यानंतर राऊत नाशिककडे रवाना झाले. राऊत यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT