कोणतंही सरकार कायम नसतं, लोकं तेवढी सुज्ञ - अमित ठाकरे

amit thackeray
amit thackerayesakal
Updated on

नाशिक : कोणतंही सरकार कायम नसतं, लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोकं तेवढी सूज्ञ आहेत, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे (Raj thackeray) चिरंजीव अमित ठाकरे यांनी नाशिकमध्ये आज (ता.२७) केले. आगामी महापालिका निवडणुकांच्या (Nashik Municipal Election) पार्श्वभूमीवर अमित ठाकरे (Amit Thackeray) चार दिवसांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

amit thackeray
सर्वांचा हिशेब चुकता करणार! नाशिकमध्ये झळकले मनसेचे पोस्टर्स

अमित ठाकरे नाशिक दौरा : जोरदार पोस्टरबाजी

'सर्वांचा हिशेब चुकता करणार' असे पोस्टर्स नाशिकमध्ये सध्या ठिकठिकाणी लावलेले दिसून येत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या (Nashik Municipal Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) युवा नेते आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit thackeray) चार दिवसांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. या निवडणुकांसाठी मनसेने चांगलीच कंबर कसली असल्याचं यावरुन दिसून येत आहे. अमित ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान नाशिकमध्ये जोरदार पोस्टरबाजी झाल्याचंही दिसून आलं. अमित ठाकरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर ,संदीप देशपांडे, अमेय खोपकर हे देखील या दौर्‍यात सहभागी होणार आहेत. दरम्यान दुपारी बारा वाजल्यापासून शहराच्या तीनही विभागांमध्ये बैठकांचा आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकांमध्ये पदाधिकार्‍यांशी चर्चा आणि शाखा अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मनसे कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची लगबग आहे.

amit thackeray
पोलिसांना सापडत नसलेले फरार कार्यकर्ते राऊत यांच्या भेटीला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com