ncp shivsena google
नाशिक

पाणीयोजना मंजुरीच्या श्रेयावरून शिवसेना-राष्ट्रवादीत ‘सोशल वॉर’

सागर आहेर

चांदोरी (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील ३६ गावांच्या प्रस्तावित ६६ कोटी १८ लाखांच्या नवीन नळ पाणीपुरवठा योजनांना शासनाकडून मंजुरी मिळाल्याने या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत मिळणार आहे. मात्र, पाणीयोजना मंजुरीवरून शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) श्रेय घेण्यावरून ‘सोशल वॉर’ सुरू आहे. (shivsena-ncp clash on social media over credit for water project approval)

तालुक्यातील अनेक गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना जीर्ण झाल्या आहेत. लोकसंख्या वाढल्याने लोकसंख्येनुसार पाणीही कमी मिळत असल्याने शासनाच्या वतीने तालुक्यातील ३६ गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत नवीन प्रस्तावित पाणीपुरवठा नळ योजनांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रत्यक्ष मूल्यमापन होऊन त्या पद्धतीने कामे होणार आहे. पूर्वीच्या झालेल्या नळ पाणीपुरवठा योजना या कमी क्षमतेच्या असून, लोकसंख्येच्या आधारावर पाइपलाइन व साठवण क्षमता असलेले जलकुंभ व इतर कामे होणार आहेत. त्यात चांदोरी जिल्हा परिषद गटात चांदोरी (४५६.८०), चाटोरी (८७.६०), शिंपी टाकळी (६७.६०) या गावासाठी सहा कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला.

दरम्यान, मंजूर झालेल्या निधीवरून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) व शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांच्या समर्थकांत चांगलेच सोशल वॉर पेटले आहे. आपल्याच नेत्यांनी ही योजना कशी मंजूर करून आणली, याचा लेखाजोखा फेसबुक, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मांडला जात आहे. जिल्ह्यात आणि राज्यात कोरोनाविरुद्धचा लढा तीव्र झाला असताना चांदोरी गटात मात्र पाणीपुरवठा योजनेचे पाणी पेटले आहे. दरम्यान, कदम व बनकर समर्थकांनी आपल्या नेत्यांचे आभार मानत अभिनंदन करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या असून, ग्रामस्थांना मात्र पाणीपुरवठा योजना सुरळीत चालू होण्याशी महत्त्व आहे.



माजी आमदार अनिल कदम यांनी आपल्या संबंधाच्या जोरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडून चांदोरी गटातील तीन गावांत सहा कोटी १२ लाख रुपये पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर केले आहे.
-संदीप टर्ले, माजी सरपंच, चांदोरी

विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी आमदार दिलीप बनकर यांच्या माध्यमातून मंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडून पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर केलेला आहे.
-शिरीष गडाख, उपसरपंच, चांदोरी
(shivsena-ncp clash on social media over credit for water project approval)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : फक्त जय आणि पार्थ हे माझं कुटुंब नाहीतर राष्ट्रवादी पक्ष हा माझा परिवार - सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT