sighting of two leopards spread fear in sinnar mirgaoan area nashik marathi news 
नाशिक

सिन्नरच्या मिरगाव परिसरात साक्षात मृत्यूचेच सावट; शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) :  रात्रीच्या अंधारात जेव्हा तुम्ही एकटे असतात अन् तुमच्या समोर तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने वेगवान आणि शक्तीशाली बिबट्या उभा ठाकतो तेव्हा तुमच्या काळजाचे पाणी झाल्या शिवाय राहणार नाही. तालुक्यातील मिरगाव परिसरात बुधवारी दि.6 रात्री 9 वाजेच्या सुमारास  असाच प्रकार घडला.. नेमके काय घडले वाचा..

साक्षात मृत्यूचे दर्शनाने शेतकऱ्यांमध्ये घबराहट

रात्री पाळीव कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज आला.. कुत्रा का विव्हळतोय ते पाहण्यासाठी अजित बिडगर घराबाहेर धावले घराच्या बाहेरच त्यांना साक्षात मृत्यूचे दर्शन झाले. त्यांनी मोठ्याने ओरडल्यावर बिबट्याने पळ काढला अन् ते बचावले. तर दुसरीकडे शेजारच्या संतोष बैरागी यांच्या ज्वारीच्या बांधावर देखील दुसऱ्या बिबट्याने दर्शन दिले. त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आवाज देऊन सावध केल्यावर या बिबट्याने लगतच असलेल्या उसाच्या शेतात धूम ठोकली. दोन वस्त्यांवर एकावेळी दोन बिबटे आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली. कुत्र्यावर हल्ला करणारा बिबट्या तासाभरात दोन वेळा वस्तीकडे आल्याने सर्व शेतकरी जनावरे सुरक्षित जागी बांधून एका वस्तीवर एकत्र आले.

रात्र जागून काढली

सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील हिंगे वस्ती, बैरागी वस्ती परिसरात बुधवारी (दि.6) रात्री 9 वाजेच्या सुमारास दोन बिबट्यांनी दर्शन दिले. शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली. तहसीलदार, वनविभागास देखील याबाबत माहिती देण्यात आली. वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी देखील रात्री वरील वस्त्यांवर भेट देऊन सकाळ होईपर्यंत सर्वांना काळजी घेण्याची आवाहन केले.

अखेर पिंजरा लावला

बिबट्या दिसलेल्या शेतांजवळून पोलीस वाहनाने सायरन वाजवला, शेतकऱ्यांनी देखील आपल्या घरांभोवती, जनावरांच्या गोठ्यांभोवती शेकोट्या पेटवल्या, मोठ्या आवाजाचे फटाके फोडले.आज (दि.8) सकाळी वनकर्मचारी नारायण वैद्य यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार मिरगाव येथे येऊन जखमी कुत्र्याची तपासणी केली. परिसरातील शेतांमध्ये देखील बिबट्याच्या पायांचे ठसे त्यांना आढळून आले. ग्रामपंचायत ने पत्र दिल्यावर सायंकाळी उशिरा या भागात पिंजरा लावण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT