esakal | मैत्रीत मोठा घात! मित्राच्याच डोक्यात घातला मोठा दगड; नशेत सांगितली धक्कादायक आपबिती
sakal

बोलून बातमी शोधा

frineds two man.jpeg

खुनी पोलिसांना जागेवरच सापडला. परंतू, ज्याचा खून झाला, त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. अखेर त्याचीही ओळख पटली असून, खून झालेला युवक व संशयित दोघेही मित्र असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी नशेच्या धुंदीत मित्राने घडलेली सर्व आपबिती पोलीसांना सांगितली.

मैत्रीत मोठा घात! मित्राच्याच डोक्यात घातला मोठा दगड; नशेत सांगितली धक्कादायक आपबिती

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : खुनी पोलिसांना जागेवरच सापडला. परंतू, ज्याचा खून झाला, त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. अखेर त्याचीही ओळख पटली असून, खून झालेला युवक व संशयित दोघेही मित्र असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी नशेच्या धुंदीत मित्राने घडलेली सर्व आपबिती पोलीसांना सांगितली. काय घडले नेमके?

खुनी पोलिसांना जागेवरच सापडला. परंतू....

महेश विष्णू लायरे (वय २९, रा. दत्तनगर, चुंचाळे) असे मृताचे नाव आहे. तर रूपेश छोटूलाल यादव (३६, रा. शिवशक्ती चौक, सिडको) असे संशयिताचे नाव आहे. मंगळवारी (ता.५) रात्री आनंदवली परिसरात वापरात नसलेल्या महापालिकेच्या निर्जन इमारतीत युवकाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. खुनी पोलिसांना जागेवरच सापडला. परंतू, ज्याचा खून झाला, त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. अखेर त्याचीही ओळख पटली असून, खून झालेला युवक व संशयित दोघेही मित्र असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला

नशेत बडबडणाऱ्या संशयिताने सांगितली माहिती

माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक अंचल मुदगल पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित नशेत बडबडणाऱ्या संशयित रूपेश यास अटक केली. तसेच, इमारतीत अंधारात पडलेल्या मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा करत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. संशयित यादव खूप मद्य पिला असल्याने खून झालेल्या मित्राचे नाव तो पोलिसांना सांगत नव्हता. यामुळे रात्री उशिरापर्यंत मृताच्या नातेवाइकांचा शोध सुरू होता. अखेरीस त्याचेही नाव निष्पन्न झाले. याप्रकरणी संशयिताविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.  

हेही वाचा > निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड 

मित्र आपल्याला संपवेल, या भीतीतून केले ठार

मद्य सेवनानंतर हाणामारी होऊन मित्र बेशुद्ध पडला. बेशुद्ध मित्र उठल्यावर आपल्याला संपवेल, या भीतीतून दुसऱ्याने बेशद्ध अवस्थेतील मित्राच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याला संपवल्याचा प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. दरम्यान, संशयितास १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.