Prakash Shejwal esakal
नाशिक

SSC Success: शिक्षणाचे महत्व कळले अन् 38व्या वर्षी 10वी उत्तीर्ण! कुसमाडीच्या उद्योजकाचा तरुणांपुढे आदर्श

संतोष विंचू

SSC Success : व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली पण मित्र, पत्नी यांच्यापेक्षा आपले शिक्षण कमीच असल्याची सल मनात होती, शिवाय व्यवसायातही अनेक ठिकाणी शिक्षणाचा अडसर उभा राहिला... अन जिद्दीने चक्क ३८ व्या वर्षी दहावी पास होण्याची स्वप्नपूर्ती केली आहे ती कुसमाडी येथील प्रकाश शेजवळ यांनी!! (SSC result Success story Kusmadi entrepreneur prakash shejwal passed 10th at age of 38 nashik news)

शेजवळ येथील युवा उद्योजक असून त्यांचे पोलंड,डंपर यात ठेकेदारीचा व्यवसाय असून यात यश मिळवत त्यांनी सामाजिक व आर्थिक प्रतिष्ठाही प्राप्त केली आहे.या व्यवसायात शिक्षणाची गरज नसली तरी कुठेतरी अडचणी आल्या आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले.

आयुष्यात कितीही प्रगती झाली तरी शिक्षणाशिवाय परिपूर्णता नाही हा विचार नेहमी मनात यायचा.सोबतचे मित्र आणि पत्नी आपल्यापेक्षा जास्त शिकली असल्याची सलही कधीकधी मनात यायची आणि याच जिद्दीतून प्रकाश शेळके यांनी पाटोदा येथील जनता विद्यालयात २४ वर्षांपूर्वी राहिलेला गणिताचा पेपर दिला आणि ते दहावी उत्तीर्णही झाले आहे...

त्यांनी १९९९ मध्ये दहावीची परीक्षा दिली होती व एक विषयात ते अनुत्तीर्ण झाले होते.त्यानंतर व्यवसायात स्थिरस्थावर होऊन यशस्वी होत गेल्याने शिक्षणाचे फारसे महत्त्व वाटले नसल्याने त्यांनी पुढील शिक्षणाकडे दुर्लक्ष केले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र तब्बल २४ वर्षानंतर दहावीची परीक्षा दिली व गणित या विषयात १०० पैकी ६९ गुण मिळवत ते उत्तीर्ण झाले आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी ही स्वप्नपूर्ती केली आहे.. विशेष म्हणजे पत्नी व मित्रांनी प्रोत्साहन दिल्याने परीक्षा देण्याचे धाडस करून उत्तीर्ण होऊ शकलो असे ते बोलून दाखवितात.

वेळोवेळी अडचणी आल्यावर शिक्षणाचे महत्त्व कळाल्याचेही ते बोलून दाखवितात किंबहुना या वयातही यापुढील शिक्षण घेण्याचाही त्यांचा मानस आहे.

"उद्योग-व्यवसायात यश मिळाले पण शिक्षणातही मागे राहू नये हे मला काही अडचणी आल्यावर समजले.अनेक वर्षापासून परिक्षा देण्याचा मानस होता.पत्नीसह मित्रांनी प्रोत्साहन दिल्याने वयाच्या ३८ व्या वर्षी माझे दहावी पास होण्याचं स्वप्न पूर्ण झाले असून याचा खूप आनंद झाला आहे." - प्रकाश शेजवळ,उद्योजक, कुसमाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT