Remdesivir
Remdesivir Sakal
नाशिक

रुग्णसंख्या घटली तरी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा मात्र कायम

विनोद बेदरकर

नाशिक : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना बाधीतांच्या(corona patients) संख्येत घट होत आहे. मात्र त्यानंतरही अत्यावस्थ रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनची (Remdesivir Injection) मागणी मात्र घटलेली नाही. खासगी ४६ हून आधिक रुग्णालयांकडून जिल्हा यंत्रणेकडे इंजेक्शनची मागणी कायम आहे.(still shortage of remdesivir injection)

वितरण गरजेऐवजी रेशनिंग धोरणानुसार

कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वात प्रचलित वैद्यकिय व्यवस्था अपुरी पडत आहे. अनेक औषधांची या काळात मागणी वाढली आहे. त्यापैकी काही औषधांचे वितरण आपत्ती व्यवस्थापन कायद्यार्तंगत प्रशासकीय यंत्रणेच्या ताब्यात गेले आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन अशापैकीच एक इंजेक्शन साधारण दोन तीन आठवड्यापासून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे वितरण जिल्हा यंत्रणेतर्फे सुरु झाले आहे. खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत असली तरी त्याप्रमाणात इंजेक्शनची उपलब्धता होत नसल्याने इंजेक्शनचे वितरण रुग्णांच्या गरजेऐवजी यंत्रणेच्या रेशनिंग धोरणानुसार(Rationing Pattern) सुरु झाले आहे. गरजेपेक्षा मागणी व पुरवठ्याच्या नियमानुसार त्याचे वितरण सुरु आहे.

तुटवडा मात्र कायमच!

केवळ इंजेक्शनच नव्हे तर अनेक नवनवीन इंजेक्शन औषधांचा या काळात कोरोना नियंत्रणासाठी मागणी वाढली आहे. त्यामुळे अशा तुटवडा जाणवणाऱ्या इंजेक्शनच्या वितरणात सुसुत्रता ठेवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने आधिकाऱ्यांची समिती नेमून त्यानुसार वितरण सुरु केले आहे. ही समितीत ऑक्सीजन बेड (Oxygen Bed) त्यावर उपचार घेणारे अत्यावस्थ (Critical) रुग्णांचीसंख्या व त्यांचे वैद्यकिय अहवाल त्यातील रुग्णांचा एचआरसीटी स्कोर(HR-CT) पाहून त्यानुसार इंजेक्शन उपलब्ध करुन देत आहे. काल शनिवारी (ता.१५) तब्बल ४६ रुग्णालयांतील १३१३ अत्यावश्यक रुग्णांसाठी ४९६ च्या आसपास इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आले. रुग्णांची संख्या घटत असतांना अद्याप रेमडेसिव्हीरचा तुटवडा मात्र कायमच आहे. मात्र अलिकडे चार पाच दिवसांपासून तीव्रता मात्र घटत आहे. एकेका आधिकाऱ्याला चार ते पाच फोन येत, त्याऐवजी आता एखाद दुसरा फोन येत असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT