seized trucks esakal
नाशिक

नाशिक : वाळूचा 72 लाखांचा साठा जप्त

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : ग्रामीण पोलिस पथकाने सिन्नर एमआयडीसी (Sinnar MIDC) व येवला तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळूची अवैध तस्करी (Sand Illegal Smuggling) करणाऱ्या वाहनांवर छापे टाकून कारवाई केली. त्यात चार हायवा ट्रक, अवैध वाळूचा ७२ लाख २६ हजारांचा साठा जप्त केला आहे. (Stocks of sand worth Rs 72 lakh seized Nashik crime News)

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या सूचनेप्रमाणे ही कारवाई झाली. श्री. पाटील यांना सिन्नर व येवला परिसरात अवैध वाळूची वाहतूक होत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यावरून पोलिस पथकाने सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पंचाळे गावच्वया शिवारात पंचाळे ते सिन्नर रोडवर अवैध वाळूने भरून जाणारे ट्रकवर छापा टाकला. छाप्यात वाळूने भरलेला ट्रक (एमएच १५, एफव्ही ५३८५) वरील चालक गणेश शिवाजी नवले (रा. कोळपेवाडी, ता.कोपरगाव) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५५ हजार ३९० अवैध वाळू, ट्रक असा १५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. चालक व मालक तसेच वाळू तस्करी करणाऱ्या मालकांविरुद्ध अवैध गौणखनिज वाहतूक व साठवणुक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे.

येवला तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरवस फाटा ते कोळपेवाडी जाणाऱ्या रस्त्यावर अवैधरित्या गौणखनिजाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिस विश्वनाथ काकड व पाठक यांना दिली. त्यावरून पोलिस पथकाने भरवस फाटा परिसरात अवैध वाळूची वाहतूक करणारे तीन हायवा ट्रक चालकांवर कारवाई केली. छाप्यांमध्ये हायवा ट्रक (एमएच १५, एजी १९५७, एमएच १६, एसी ९९३४) व (एमएच १७, बीजेड ६५५५)

या वाहनांवरील चालक विलास नागरे (रा. विंचूर, ता. निफाड), देविदास निवृत्ती कानडे (रा. लौकी शिरसगाव, ता. येवला) व ज्ञानेश्वर बुरूंगुले (रा. मीरगाव वावी, ता. सिन्नर) हे कोणताही अधिकृत परवाना नसताना शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अवैध वाळू चोरून घेऊन जात असताना, मिळून आले. ट्रक चालक व मालक तसेच गौणखनिज वाळूची तस्करी करणाऱ्या मालकांविरुद्ध भादंवि कलम ३७९, ४२०, ४६५,४६७, ४६८, ४७१, ३४ सह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८/७ प्रमाणे कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT