MPSC Passouts of Nashik
MPSC Passouts of Nashikesakal

MPSC : नाशिकच्‍या उमेदवारांचा डंका

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्‍या राज्‍य सेवा (मुख्य) (Mains Exam) परीक्षा २०२० चा अंतिम निकाल मंगळवारी (ता.३१) सायंकाळी जाहीर करण्यात आला. नाशिकच्‍या उमेदवारांनी या परीक्षेत यशस्‍वी (Successful) कामगिरी केली आहे. वैभव आंबेकर, सागर मनोरे, डॉ.स्‍नेहल शेलार, पुनम अहिरे, महेश मौले या उमेदवारांनी यश मिळविल्‍याने त्‍यांची विविध पदांकरिता (Posts Selection) निवड जाहीर झाली आहे. (Nashik candidates success MPSC Nashik MPSC News)

राज्‍य सेवा परीक्षा २०२० या परीक्षेत नाशिकच्‍या वैभव आंबेकर याने नायब तहसीलदारपदी यश मिळविले आहे. सागर मनोरे याने कक्ष अधिकारी, डॉ. स्‍नेहल शेलार हिने उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी, पूनम अहिरे हिने कक्ष अधिकारी तर महेश मौले याने सहायक प्रकल्‍प अधिकारी पदाला गवसणी घातली आहे.

MPSC Passouts of Nashik
Nashik : गंगापूरला आणखी 1 खून

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ४ ते ६ डिसेंबर २०२१ ला राज्‍य सेवा (मुख्य) परीक्षा २०२० घेण्यात आली होती. संपूर्ण प्रक्रिया पार पडल्‍यानंतर २९ एप्रिलला सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांबाबत प्रस्‍तुत परीक्षेच्‍या जाहिरातीच्‍या वेळी अस्‍तित्‍वात असलेल्‍या नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. या निकालात दोनशे पदांवर उमेदवारांची शिफारस विविध पदांसाठी केली आहे. यामध्ये विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्‍त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी, सहाय्यक आयुक्‍त/प्रकल्‍प अधिकारी, उद्योग विभागातील उपसंचालक (तांत्रिक), उप शिक्षण अधिकारी, गट अधिकारी, नायब तहसीलदार यांसह अन्‍य विविध पदांचा समावेश आहे.

MPSC Passouts of Nashik
जुने नाशिक : हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

अन्‌ डॉ.स्‍नेहल प्रशासकीय सेवेत दाखल

मराठा हायस्‍कूल येथून शालेय शिक्षण घेतल्‍यानंतर स्‍नेहल शेलार हिने केटीएचएम महाविद्यालयातून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतले. पुढे मुंबईतील केईएम रुग्‍णालय येथून एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली. प्रशासकीय सेवेत दाखल होण्याच्या तीव्र इच्‍छेतून तिने २०१९ मध्ये राज्‍यसेवेची परीक्षा दिली. पहिल्‍या प्रयत्‍नात अवघ्या काही गुणांमुळे संधी हुकली. परंतु धेय्य प्राप्तीसाठी अथ्थक प्रयत्‍न सुरु ठेवताना तिने २०२० च्‍या परीक्षेत यश मिळविले आहे. युनिव्हर्सल फाउंडेशनचे संचालक प्रा.राम खैरनार यांचे तिला मार्गदर्शन मिळाले.

रूपाली जाधव यांची यशाला गवसणी

मूळच्या औरंगाबाद येथील व सध्या नाशिक येथे विक्री कर निरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्‍या रूपाली जाधव यांनीही परीक्षेत यशस्‍वी कामगिरी केली आहे. औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्‍प्‍युटर इंजिनिअरिंग झालेल्‍या रूपाली जाधव यांनी काही काळ खासगी कंपनीत नोकरी केली. नंतर स्‍पर्धा परीक्षांच्‍या तयारीला सुरवात केली. नोकरी करत असताना केलेल्‍या अभ्यासातून त्‍यांनी एमपीएससीच्‍या परीक्षेत यश मिळविले. व २०१९ पासून विक्रीकर निरीक्षक म्‍हणून त्‍या कार्यरत होत्या. कोरोना महामारीच्‍या काळात कामकाज प्रभावित झालेले असताना, मिळेल तितका वेळ अभ्यास करताना त्‍यांनी दुहेरी यश संपादन केले आहे. नुकताच जाहीर झालेल्‍या निकालात त्‍यांची विक्रीकर विभागाच्‍या सहाय्यक आयुक्‍तपदी निवड झालेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com