lockdown Nashik Sakal
नाशिक

नाशिकमध्ये वीकेंड लॉकडाउनची कडक अंमलबजावणी

विनोद बेदरकर

नाशिक : तिसरी लाट आणि डेल्टा प्लसच्या धसक्यामुळे शासनाने लॉकडाउन निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्याने दोन दिवसांपासून शहर-जिल्ह्यात कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. (Strict implementation of weekend lockdown restrictions in Nashik)


शनिवार व रविवार वीकेंड लॉकडाउन असला तरी दोन आठवड्यांपासून वीकेंड लॉकडाउनमधील निर्बंधांबाबत लोकांकडून काळजी घेतली जात नसल्याचे चित्र होते. मात्र शुक्रवारपासून राज्य शासनाने राज्यभर कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले. सलग दोनदा लॉकडाउनचे उल्लंघन केल्यास थेट संबंधित दुकान आस्थापना कोरोना साथरोग संपेपर्यंत बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावर पोलिसांना लक्ष ठेवण्याचे निर्देश असल्याने दोन दिवसांपासून वीकेंड लॉकडाउनमध्ये कडक अंमलबजावणी दिसू लागली आहे. शहर-जिल्ह्यात आज (रविवार) वीकेंड लॉकडाउनचा कडक अंमल दिसला. शहरात सकाळपासून प्रमुख मार्गावर वाहतूक पोलिसांचा राबता होता.



पिकनिक स्पॉटवर लक्ष

बॅरिकेडिंग नसली तरी वाहनांवर पोलिस लक्ष ठेवून होते. त्र्यंबकेश्वर मार्गावर पहिणे व इतर प्रेक्षणीय स्थळांवर गर्दी होत असल्याने पोलिसांनी गड-किल्ल्यांकडे जाणारे रस्ते, प्रेक्षणीय स्थळ पर्यटन केंद्र म्हणून गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर सकाळपासून लक्ष केंद्रित केले होते. शहरातून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात होती. वीकेंड डेस्टिनेशनसाठी प्रसिद्ध असलेल्या विविध स्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिस पाळत ठेवून होते. वाहनांची चौकशी सुरू होती. त्यामुळे पोलिसांचा ससेमिरा चुकवित पर्यटन स्थळ गाठताना अनेकांना माघारी येण्याची वेळ आली.

(Strict implementation of weekend lockdown restrictions in Nashik)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT