Sudhakar Badgujar Esakal
नाशिक

Sudhakar Badgujar: '...तर मी ACB कार्यालयासमोर जाहीरपणे जीव देईन', सलग चौथ्या दिवशीच्या चौकशीवर काय म्हणाले बडगुजर?

सलग चौथ्या दिवशी सुधाकर बडगुजर चौकशी करण्यात येणार आहे. बडगुजर यांच्या अन्य दोन भागिदारांचीही एसीबी चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

माझी कागदपत्रं खोटी असतील आणि गुन्हा सिद्ध झाला तर शिवसौनिकांसमोर आणि एसीबी कार्यालयासमोर फाशी घेईन, असा इशारा नाशिकचे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिला आहे. एसीबीने मला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पण मला कोर्टातून ऑर्डर झाली आहे, ते 106 पाने आहेत ते दाखल करण्यासाठी वेळ लागणार असल्याने मी आठ दिवसांची मुदत मागितली आहे, असं बडगुजर आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

सलग चौथ्या दिवशी सुधाकर बडगुजर चौकशी करण्यात येणार आहे. बडगुजर यांच्या अन्य दोन भागिदारांचीही एसीबी चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच एसीबीच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत करण्यात आलेल्या झाडाझडतीत काही महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना बडगुजर म्हणाले की, ACB ने अचानक रात्री ७ वाजता नोटीस दिली. ७.३० वाजता माझ्या दोन्ही बंगल्यावर छापा टाकला. त्यापूर्वी ACB ने गुन्हा दाखल केला. माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला, मी माझ्या आयुष्यात कधीच कुणाची फसवणूक केली नाही. हे माझ्या जिव्हारी लागलं आहे. मला निवडणूक लढवायची होती, २००६ला मी कंपनीतून राजीनामा दिला. रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर देखील झाले. कोर्ट पीटिशन झालं, २०११ ला कोर्ट ऑर्डर देखील मिळाली. ACB ला कोर्ट ऑर्डर माहीत नव्हती का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.(Latest Marathi News)

पुढे ते म्हणाले की, निवृत्ती आणि सेवा निवृत्ती कधी झाली हे या कोर्ट ऑर्डरमध्ये आहे. २०१३ मध्ये तक्रार दिली मग ACB ला १० वर्षे का लागले? अन्याय करण्यासाठी पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत असल्याचंही बडगुजर यांनी म्हटलं आहे. तर पोलिसांनी थोडा संयम ठेवायला हवा, असंही ते म्हणालेत.

आम्हाला पोलिसांशी संघर्ष करायचा नाही. पण शिवसैनिकांवर चुकीच्या केसेस दाखल केल्या जातात. जर माझ्याकडे असलेले कागदपत्र बनावट असतील तर मी या शिवसैनिकांसमोर आणि ACB कार्यालयासमोर जाहीरपणे आत्महत्या करेन असंही बडगुजर म्हणाले. तर हा त्रास देण्याचा प्रकार आहे. अन्यायकारक कारवाई करू नका, सत्ता येते, सत्ता जाते सत्त्तेचा उन्माद फार काळ टिकत नाही असंही बडगुजर पुढे म्हणालेत. (Marathi Tajya Batmya)

तर १० वर्षात ACB ने केवळ एकदाच चौकशीला बोलावलं असल्याचं त्यांनी म्हटलं. ह्युमन राईट्स आणि सेंट्रल व्हिजीलन्स चा आमच्याकडं पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व पोलीस दबावात काम करतात असं नाही, काही पोलीस चागलं काम करतात असंही ते म्हणाले. तर आता चौकशीला जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मी ACB ला पत्र देतोय. माझ्यावर जे कलम लावलेले आहेत, त्याची माहिती कोर्टातून मला काढावी लागेल, त्यासाठी मला ७-८ दिवसांची मुदत द्यावी असंही ते म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

अँटी करप्शन ब्युरोच्या कचाट्यात बडगुजर सापडले आहेत. एसीबीने सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, २०१६ मध्ये बडगुजर महापालिकेमध्ये असताना त्यांच्याकडून काही कंत्राट त्यांच्या जवळच्या कंपनीला देण्यात आले होते. याप्रकरणी तपास सुरु होता. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT