नाशिक

Nashik Crime : हटकल्याने नागरिकांवर रोखले बंदूक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : दुचाकीवरून परिसरात घिरट्या घालत असलेल्या तरुणांना हटकल्याचा राग आल्याने एका संशयिताने नागरिकांच्या डोक्यावर बंदूक रोखत त्यास गोळ्या घालत ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गोरक्षनगर परिसरात घडला. (suspect held gun at citizens nashik crime news)

यानंतर तिघांपैकी एकाने या इसमावर धारदार शस्त्राने वार करत घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे मात्र परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. गोरक्षनगर भागात तिघे तरुण हे दुचाकीवरून घिरट्या घालत होते.

याचवेळी येथील एक नागरिक आपल्या कुटुंबासह घराजवळ उभे होते. त्यांना या तरुणांना थांबवीत तुम्हाला पत्ता सापडत नाही आहे का? तुम्हाला कोण पाहिजे असे विचारले.

या गोष्टीचा राग आल्याने तिघांपैकी एकाने आपल्या जवळील बंदूक काढत थेट या नागरिकांच्या डोक्याला लावत तुला गोळ्या घालू का असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर दुसऱ्याने त्याच्याजवळील धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केला. मात्र त्यांनी तो वार हुकला मात्र यात त्यांच्या डोक्याला जखम झाली. त्यांच्या कुटुंबाने आरडाओरड करताच तिघांनी पळ काढला. या घटनेकडे बघता पोलिसांनी 'ॲक्शन' मोडमध्ये येत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची पाहिजे अशी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Cricket : भारत-पाकिस्तान यांच्यात नोव्हेंबर महिन्यात दोन मॅच; जाणून घ्या कुठे, कधी भिडणार, Live Streaming कुठे?

Chandrapur ‘मन की बात’ ऐकण्याची सक्ती, विद्यार्थिनींना दंडाचा इशारा; दिवंगत काँग्रेस नेत्याच्या कॉलेजमधील प्रकार

Torrent Project: 'टोरंट'साठी बेसुमार वृक्षतोड! तब्बल ३२ हजार झाडे तोडणार; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल पुन्हा फेल! न्यूझीलंडच्या २०४ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना ढेपाळले... Video

Sindhudurg Heavy Rain: सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार पाऊस, ईशान्य मॉन्सूनचा जोर कायम

SCROLL FOR NEXT