sanjay marathe sakal
नाशिक

कलेच्या छंदाने शिक्षकाची ‘सेकंड इनिंग’

आजारावर मात करत चित्रकार संजय मराठे यांची भरारी

आनंद बोरा,सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जीवन सुंदर आहे. जीवनात बरेच काही करण्यासारखे आहे. त्यातील एक आहेत, ज्येष्ठ चित्रकार संजय मराठे. त्यांनी कलेच्या छंदाने आजारावर मात करत ‘सेकंड इनिंग’ सुरू केली आहे. ओझरच्या एचएएल हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून ते कार्यरत होते. आठ वर्षांपासून ते व्यवस्थित चालू शकत नाहीत. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. कलेने त्यांना पुन्हा उभे केले.

अर्धांगवायूने आठ वर्षांपूर्वी श्री. मराठे यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. उजवा हात आणि पायाने काम करणे सोडून दिले. २१ दिवस अतिदक्षता विभागात उपचार घेतले. आजारावर मात करण्यासाठी कला धावून आली. ज्या हाताने ते सप्तरंगांशी खेळायचे, स्केच काढायचे, निसर्ग, इतिहासातील क्षण कागदावर रेखाटायचे, तोच हात आता हलवता येत नव्हता. त्यांनी डाव्या हाताने चित्र काढण्यास सुरवात केली. जो हात कधी काम करीत नव्हता, तो डावा हात आता चित्र साकारण्यासाठी तयार होता. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि आता ते डाव्या हाताने सुंदर चित्र साकारत आहेत.

मोठ्या आजाराला चित्रकलेच्या माध्यमातून आठ वर्षे झुंज देत श्री. मराठे यांनी पळवून लावले आहे. जीवन म्हणजे दोन घडीचा डाव आहे, जीवन हा एक संघर्ष आहे, त्याला न घाबरता उभे राहणे हाच जगण्याचा खरा मार्ग असल्याचे श्री. मराठे सांगतात. त्यांनी दोन वर्षांत दोनशेपेक्षा अधिक चित्रे साकारली आहेत. त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र लक्ष वेधून घेते. ज्या शाळेत ते शिकले, त्याच शाळेत त्यांनी शिक्षक म्हणून काम केल्याचा अभिमान त्यांना आहे. त्यांना छायाचित्रणाची आवड आहे. कोरोनाकाळात त्यांनी घरी अनेक मुलांना चित्र काढायला शिकविले. जे. जे. स्कूलमध्ये त्यांनी चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पत्नी सुरेखा खंबीरपणे त्यांच्या मागे उभ्या आहेत.

"आजारामुळे आठ वर्षांपासून घरी आहे. चित्रकलेने जीवन जगण्याचे शिकविले. मी डाव्या हाताने शेकडो चित्रे काढली आहेत. आता एक प्रदर्शन नाशिकमध्ये भरविण्याची इच्छा आहे."

-संजय मराठे, चित्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel - Iran War युद्धाचा भडका! इस्रायलचा इराणवर हल्ला, देशात आणीबाणी लागू; एअरस्पेस बंद, सर्व शाळांना सुट्टी

चेंबूरमध्ये भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ८व्या मजल्यावरून कोसळले ६ मजूर

Mumbai Goa Highway Delay : कोकणवासीयांचा संताप! मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात दिरंगाई; बड्या ठेकेदारांना ठोठावला तब्बल 16 कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : चेंबूरमध्ये धक्कादायक घटना, इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून पडले 6 कामगार

PG Portal : सरकारी ऑफिसमध्ये फेऱ्या मारून वैतागलाय? घरबसल्या 'इथे' करा कोणत्याही विभागाची तक्रार; थेट पंतप्रधान कार्यालयात पोहोचेल तुमचं म्हणणं

SCROLL FOR NEXT