Nashik Crime News esakal
नाशिक

Chalisgaon : घरात चोरी करताना रंगेहाथ पकडले

आनन शिंपी

चाळीसगाव (जि. नाशिक) : शहरातील पोतदार शाळेच्या परिसरातील एका घरात मध्यरात्री चोरी (Burglary) करण्यासाठी घरात घुसलेल्या चोरट्याला रंगेहात पकडले. याबाबत चोरट्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (thief Caught red handed while doing burglary)

महेंद्र लक्ष्मणराव शितोळे (वय ४५, रा. पोतदार शाळेजवळ, चाळीसगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह २ मे रोजी रात्री दहला जेवण झाल्यानंतर शेतात पाणी भरण्यासाठी निघून गेले. त्यानंतर त्यांचे सर्व कुटुंबीय झोपलेले असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास महेंद्र शितोळे व त्यांचे मावसभाऊ सचिन वाबळे हे दोघे शेतातून घरी आले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन पाहिले असता, एक चोरटा घरात चोरी करताना आढळून आला. महेंद्र आणि सचिन यांनी त्याला पकडून ठेवले. दोघांनी आजूबाजूच्या रहिवाशांना आवाज देऊन बोलावल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पकडलेल्या चोरट्याने त्याचे नाव पंढरीनाथ नागो जाधव (वय २५, रा. हरीगिरीबाबा नगर, चाळीसगाव) असे सांगितले. त्याच्या विरोधात महेंद्र शितोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जवसुलीबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे, RBIची कठोर नियमावली जारी

Tukaram Mundhe: ‘आयएएस’ झाल्‍यानंतर ठरवलेलं ध्येय ओळख देतं; अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची भावना

घरात ठेवा ही एक छोटीशी वस्तू; नशीब पालटेल, अनुष्का शर्माच्या यशामागेही आहे खास कनेक्शन!

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर विमानतळावर दाखल

Car Accident News : LPG सिलिंडरच्या ट्रकला कारची धडक, तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT