Chain Snatching Crime esakal
नाशिक

Nashik Crime: शिवमहापुराण कथेत चोरट्यांनी साधली पर्वणी; 15 महिलांच्या पोती लंपास

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पाथर्डी गाव परिसरात पं. प्रदीप मिश्रा यांचा शिवमहापुराण कथा सोहळा सुरू आहे. यासाठी शहरासह परजिल्ह्यातून लाखो भाविक आलेले आहेत.

मात्र सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी चोरट्यांनी संधी साधली असून, गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील, लहान मुलांच्या कानातील दागिने ओरबाडून लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत.

पहिल्याच दिवशी १५ महिलांच्या गळ्यातील सुमारे २१ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Thieves activity increased in Shiva Mahapuran story 15 Women chain theft Nashik Crime )

सोहळ्यासाठी आलेल्या लाखो भाविकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. मात्र या सोहळ्यातून चोरट्यांनी जणू पर्वणीच साधली आहे.

पहिल्याच दिवशी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत १५ महिलांच्या अंगावरील सोन्याच्या पोती व एका पुरुषाची सोन्याची चैन असा सुमारे २१ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. सदर कथा सोहळा शनिवारपर्यंत (ता. २५) आहे.

त्यामुळे चोरीचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. तसेच पोलिस बंदोबस्तातही वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

यांचे दागिने चोरीला

स्वाती दिलीप अहिरराव (५७, रा. मालपाणी सॅफ्रॉन सोसायटी, पाथर्डी फाटा), सोनाली हितेश अमृतकर (३०, रा. वासननगर) यांची १३ ग्रॅम पोत, कल्पना शशिकांत कुमटेकर (रा. रविवार पेठ) यांची १२ ग्रॅमची पोत, शोभा पुरुषोत्तम मते (रा. गंगापूर रोड), वर्षा वसंत पवार (४२, रा. सिडको) यांची १८ ग्रॅमची पोत, सरला भिकाजी लिंगायत ( ५३, रा. इंदिरानगर) यांची १५ ग्रॅमची पोत,

अश्विनी शंकर वराडे (३४, रा. पंचवटी), छाया योगेश मटाले (३६, रा. कामटवाडा) यांची अडीच तोळ्याचे मंगळसूत्र, पुष्पा रमेश कानकाटे (४५, रा. श्रीकृष्णनगर, पंचवटी) १७ ग्रॅम, शोभा बहिरू जावळे (रा. हरसुल) यांची १५ ग्रॅमची पोत, शशिकला प्रकाश रावते (रा. अंबरनाथ) यांची १६ ग्रॅमची पोत, अरुणाबाई नाना पाटील (रा. नाशिकरोड) यांची १४ ग्रॅमची पोत, विजया दादा बरे ( रा. पाथर्डी फाटा) यांची १७ ग्रॅमची पोत तर, शिरीषकुमार तानाजी चव्हाण यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चैन चोरट्यांनी लंपास केली.

"लाखोंच्या संख्येने भाविक आलेले आहेत. त्यासाठी चोख पोलिस बंदोबस्तही आहे. गुन्हे शाखेच्या साध्या वेशातील पोलिसही तैनात आहेत. तसेच, शहरातील चोरट्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आलेली आहे. भाविकांनीही मौल्यवान दागिने गर्दीच्या ठिकाणी परिधान करणे टाळावे."- नितीन पगार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, इंदिरानगर पोलिस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government talks CJP : सोनम वांगचुकनी उपोषण सोडल्यानंतर मोठी घडामोड! कॉकरोच जनता पार्टीसोबत सरकार चर्चेला तयार, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार?

Spinach Cheese Sweet Corn Mini Paratha: मुलांच्या डब्यासाठी बेस्ट! पालक-चीज-स्वीट कॉर्नचे मिनी पराठे एकदा नक्की ट्राय करा

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

PM मोदींचा VIDEO अन् नड्डांची भेट, वांगचुक यांचं उपोषण मागे; पण CJPचे आंदोलन सुरूच, प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम

आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात २ लाख! पंढरपूर तालुक्यातील ‘या’ ७ शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कर्जमुक्तीचे सातबारा, पंढरपूर बाजार समितीत कृषी महोत्सव

SCROLL FOR NEXT