Thieves caught on CCTV esakal
नाशिक

Crime Update : पिंपळगाव बसवंतमध्ये चोरट्यांनी दुकाने फोडली

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पिंपळगाव बसवंतमध्ये चोरट्यांनी धुडगूस घालत शहरातील अंबिकानगर येथील किराणा दुकान, शेती औषधांचे दुकान फोडून गल्ल्यातील रोख रक्कम आणि विहिरीतील मोटर तसेच एका दुचाकीची चोरी करत चार चोरट्यांनी पोबारा केला. दुसरी घटना शहरातील निफाड फाटा परिसरातील वेशीमधील स्वच्छतागृहाची पाण्याची मोटार देखील चोरट्यांने चोरून नेली.

चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरवात केल्याने पिंपळगाव पोलिसांसमोर चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान आहे. (Thieves break into shops in Pimpalgaon Baswant Nashik Crime Update Latest Marathi News)

पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार वणी चौफुली लगत असलेल्या अंबिकानगर परिसरात चार चोरट्यांनी वणी चौफुलीजवळील महेंद्र खोडे यांच्या चार चाकी वाहनाची स्टेफनी तर राजेंद्र विधाते यांच्या पाणी ओढण्याच्या विहिरीतील मोटार आणि मोटरसायकल तसेच देवी मंदिरासमोर असलेल्या जय बाबाजी किराणा आणि शेजारी शेती औषध दुकानाचे शटर तोडत आतमध्ये प्रवेश केला.

गल्ल्यातील रोकड लंपास करून पोबारा केला. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात फिर्यादीच्या माहितीनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Employees DA Hike : एसटी महामंडळाच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्ता ५८ टक्क्यांपर्यंत वाढवला; मंत्री सरनाईकांची माहिती

Aditya Thackeray: "स्वतःच्या खात्याची माहिती नाही, उत्तर द्यायलाही भीती!" आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सभागृहावर बहिष्कार

Latest Marathi News Live Update : पहिल्याच पावसात एसटीची पोलखोल! नवापूर-नाशिक बसमध्ये छतातून पाण्याचा वर्षाव

लाँच होतीये Motorola Edge 70 Max सिरिज; तब्बल 5 स्मार्टफोनचं पॅकेज, प्रीमियम फीचर्स अन् परवडणारी किंमत फक्त...

Mumbai News: प्रवाशांचे हाल संपणार! हार्बर मार्गावरील तीन स्थानके मध्य रेल्वेची होणार, कोणती आणि का?

SCROLL FOR NEXT