thieves stole gold jewelry and cash esakal
नाशिक

मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांचा धुमाकूळ; सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

दीपक खैरनार

अंबासन (जि. नाशिक) : मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी सोन्याचे दागिने तसेच पंचवीस हजार रक्कमेवर डल्ला मारला असून पंचक्रोशीत अजून चार ठिकाणी त्याच दिवशी चोरी झाल्याची चर्चा होत आहे. जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी पहाणी केली असून चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

चोरट्यांचा सोन्यावर डल्ला

जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील द्याने, उत्राणे, खामलोण व नामपूर येथे एकाच रात्री घरफोड्या झाल्याने चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पोलिसांनी रात्रीच्या बंदोबस्तात वाढ केली असून चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती जायखेडा पोलिसांनी दिली आहे. द्याने येथील भाऊसाहेब भिका कापडणीस यांच्या गावातील घरी आई शांताबाई राहत आहेत. श्रीमती शांताबाई या कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटातील तीन तोळ्याच्या पुतळ्या, तीन ग्रॅम कानातील रिंगा, सहा ग्रॅम तोंगल व पंचवीस हजार रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. तसेच निंबाजी कापडणीस यांच्या शेतातील शेतीच्या साहित्यावरही डल्ला मारला आहे.

जायखेडा पोलिसांत याबाबत माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधीसह, उपनिरीक्षक तुषार भदाणे घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी जायखेडा पोलिसांनी हद्दीतील गावांमध्ये गस्ती वाढविण्यात आली असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Clouds Arabian Sea : मॉन्सूनची चाहूल! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर मोठे ढग तयार; मुंबईसह उपनगरांत पावसाला सुरूवात

मंदार चांदवडकर नाही तर तारक मेहतामधील भिडे गुरुजीच्या भूमिकेसाठी 'या' मराठी अभिनेत्याला मिळाली ऑफर !

आनंदवार्ता! वाघ संवर्धनाला नवी चालना; ताडोबातील 'झिनत' ने ओडिशात दिला चार शावकांना जन्म

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वाढले?

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलात भावात 7% वाढ झाल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू! पाहा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर

SCROLL FOR NEXT