Death News esakal
नाशिक

Nashik News : वाहनाच्या धडकेत 2 दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात गारठा वाढला असताना भरधाव वाहने चालवून दुचाकीस्वारांना उडविल्यानंतर पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांत वेगवेगळ्या तीन अपघात झाले. त्यातील दोन अपघातात दोघांचे मृत्यू झाले.

पहिल्या घटनेत म्हसरुळ मखमलाबाद लिंक रोड वर शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. संतोष बाळकृष्ण चारोस्कर (वय २९, गुलमोहर बिल्डींग, मखमलाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास प्रभातनगर भागात दुचाकीस्वार त्याच्या ॲक्टीव्हावरून (एमएच १५ ईआर ६६२३) म्हसरुळ मखमलाबाद रोडवरून प्रभातनगर भागातून जात होता. रात्री आठच्या सुमारास भरधाव आलेल्या वाहनाने समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वार संतोष याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. (Two bikers killed in a collision a vehicle Nashik News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

त्याला उपचारार्थ दाखल केले असता त्याचे निधन झाले. याप्रकरणी मृताचा आतेभाऊ राहुल खंडेराव तांदळे यांच्या तक्रारीवरून म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक व्ही. के. माळी तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत जेल रोडला इंगळेनगर जेल टाकी परिसरात शुक्रवारी रात्री भरधाव वाहनाच्या धडकेत स्कुटी चालकाला श्रीकांत विजय साबळे (वय ४५, नंदनवन हाउस, अपूर्वा कॉलनी टाकळी जवळ) यांचे निधन झाले.

शुक्रवारी (ता.९) रात्री पावणेअकराच्या सुमारास श्रीकांत साबळे हे राकेश अशोक साबळे यांना भेटण्यासाठी त्यांच्या ॲक्टीव्हावरून (एमएच १५ जीएन ५९७१) जेल रोड पाण्याच्या टाकीजवळ येत असताना त्यांची ॲक्टीव्हा कॅनाल रोड कडे वळत असताना नांदूर नाक्याकडून आलेल्या चारचाकीने त्यांच्या ॲक्टीव्हाला धडक देत फरफटत नेले. त्यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, पहाटेच्या सुमारास डॉ. राहुल पाटील यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT