Nashik News : समाजकंटकका कडून भाताच्या उडव्याला आग

Fire In Rice Farm
Fire In Rice Farmesakal

पेठ : तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी यांनी तयार केलेल्या भाताचे उडव्यांना काही समाजकंटक यांनी आग लावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. याप्रकरणी सर्व नुकसानग्रस्त शेतकरी यांना आगीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. या आगीमुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

तालुक्यातील जोगमोडी, आंबे, मेंढाचापाडा , काळुणे, म्हसगण, सावरीचापाडा, म्हसगण, वखारपाडा, पिंपळपाडा परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात भाताचे उडवे रचून ठेवले होते. शुक्रवारी (ता.९) रात्री काही समाजकंटक यांनी या रात्रीचा फायदा घेत सर्व भाताच्या उडवे यांना आग लावून शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान केले. (Fire on paddy field for Samaj Kantak Nashik News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

Fire In Rice Farm
Nashik News : छोट्या राधेयने आपल्या वाढदिवसाचा खर्च दिला मंदिर जीर्णोद्धारासाठी दान!

भाताच्या उडव्यांना आग लागताच शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी धावाधाव केली. मात्र तो पर्यंत मोठ्या प्रमाणात भात जळून गेला. भाताचे उडवे रचल्यानंतर शेतकरी सवडीने भात मळणी करून वर्षभर आपल्या उदरनिर्वाहाची सोय करणार होते. मात्र रात्रीच समाजकंटक यांनी सर्व उडवे जाळून टाकले.

नुकसानग्रस्त शेतकरी

हिरामण अलबाड (वखारपाडा), रामदास शिंगाडे(काळूणे), नागू जाधव (काळूणे ), हौसाबाई गायकवाड (आंबे), परसराम भडांगे (आंबे.), रमेश गायकवाड (आंबे), परसराम चौधरी (म्हसगण), रामदास शिंगाडे (काळूणे), नागू जाधव (काळूणे), दतु खंबाईत (पिंपळपाडा), मोतीराम महाकाळ (मेंढाचापाडा) या शेतकऱ्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण होऊन हळहळ व्यक्त येत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे मागणी केली आहे.

Fire In Rice Farm
Nandurbar News : बॅटरी चोरणारी टोळी LCBच्या जाळ्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com