marathi sahitya sammelan esakal
नाशिक

साहित्य संमेलनाची कागदपत्रे द्या; निमंत्रकांना अल्टिमेटम

तुषार महाले

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनावर (marathi sahitya sammelan) साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या लेखानंतर स्वागत समितीचे सदस्य श्रीकांत बेणी यांनी संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांना आणखी एक पत्र लिहून संमेलनाच्या आयोजनासंदर्भात असलेले कागदपत्रांसह आर्थिक हिशेब मंगळवार (ता. २९) पर्यंत मिळावा, अशी मागणी करीत १ जुलैला लोकहितवादी मंडळाच्या कार्यालयात येणार असल्याचे म्हटले आहे. (ultimatum-to-invitees-marathi-sahitya-sammelan-nashik-marathi-news)

निमंत्रकांना अल्टिमेटम

श्रीकांत बेणी यांनी पत्रकात म्हटले आहे, की संमेलन सार्वजनिक देणग्यांमधून होत असल्याने पारदर्शी पद्धतीने कसे होत आहे, याबाबत एक नागरिक म्हणून जाणून घेण्याचा अधिकार आहे. पत्रकात श्री. बेणी यांनी विविध मागण्या केल्या आहेत. त्यात लोकहितवादी मंडळाची लेखापालांनी तपासलेली हिशेबपत्रके, साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीच्या बैठकांचे इतिवृत्त, बैठकांचे निमंत्रण कसे पाठविण्यात आले, याचा तपशीलासह बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांची प्रत, संमेलनाच्या आराखड्याची प्रतीसह संस्थेवर सोपविण्याचा ठराव करण्यात आला. त्या बैठकीचे इतिवृत्त संमेलनाच्या वेळोवेळी करण्यात आलेल्या अंदाजपत्रकाची प्रत, संमेलनासाठी आजपर्यंत किती निधी खर्च झाला आहे याची माहितीसह संमेलनात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांचा अंदाज, संमेलनासाठी किती रकमेची किती पावतीपुस्तक छापण्यात आली यांसह विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

सोशल माध्यमांद्वारे पत्र न पाठवता श्रीकांत बेणी यांनी संमेलनाबाबत ज्या काही कागदपत्रांची पडताळणी करायची आहे ती कार्यालयात येऊन करावी. कागदपत्रांची पूर्तता केली जाईल. - जयप्रकाश जातेगावकर, निमंत्रक, मराठी साहित्य संमेलन, नाशिक

कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सोशल माध्यम हा पर्याय नसून कागदपत्रे सगळी आहेत. २९ तारखेआधी सुद्धा त्यांना उपलब्ध होतील. त्यांनी कार्यालयात येऊन सविस्तर माहिती घ्यावी. त्यांच्या मागणीला आमचा विरोध नसून संमेलन चांगले व्हावे यासाठी प्रयत्न आहे. नाशिकचे संमेलन श्रीकांत बेणी यांना सोबत घेऊन यशस्वी केले जाईल. -हेमंत टकले, विश्वस्त लोकहितवादी मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT