vanchit bahujan aghadi
vanchit bahujan aghadi vanchit bahujan aghadi
नाशिक

Vanchit Bahujan Aghadi | नाशिक मनपात ‘वंचित’ला हव्यात पन्नास जागा : अविनाश शिंदे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर युतीची घोषणा झालेली असल्याने वंचित बहुजन आघाडीला नाशिकमध्ये किमान ५० जागा सुटल्या पाहिजेत, अशी आमची आग्रही मागणी राहील.

असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांनी केले. (Vanchit Bahujan Aghadi Avinash Shinde Fifty seats needed for disadvantaged in Nashik Municipality nashik news)

वंचित बहुजन आघाडीने महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सातत्याने दौरे केल्यामुळे पक्षाचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य वाढले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच इतर अनेक पक्षांचे मान्यवर नेते आणि कार्यकर्तेही पक्षाशी संपर्क साधून असून त्यांनाही तिकिटाची मोठी आस लागून राहिली आहे.

या क्षणी निवडणुका लागल्या तरी सर्व १२२ जागांवर भक्कम उमेदवार आम्ही उभे करू शकतो. इतकी आमची ताकद निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यात युतीबाबत बोलणी झाली आहे.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

त्यामुळे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा भाऊ मानतो आणि ५० जागांवर आम्ही त्यांच्याकडे दावा करणार आहोत. उर्वरित ७२ जागा त्यांनी घ्याव्यात, असे आमचे म्हणणे आहे.

युतीचे जागावाटप असे झाले तर शिवशक्ती आणि भीमशक्तीला कोणी रोखू शकणार नाही व नाशिक महानगरपालिकेवर उभय पक्षाचा संयुक्त झेंडा निश्चितच फडकेल असा विश्वास वाटतो, असेही शिंदे म्हणाले.

युतीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांबरोबर या आधी प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली आहे. आता लवकरच आणखी महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यावेळी आम्ही जागा वाटपाबाबत आमचा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडू असेही शिंदे यांनी स्पष्ट केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT