Election Boycott esakal
नाशिक

Nashik News: देवळा तालुक्यातील गावे महसुली दर्जापासून वंचित! निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

देवळा : तालुक्यातील श्रीरामपुर, खुंटेवाडी व विजयनगर या तीन गावांमध्ये ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून अद्यापही महसूल गावांमध्ये समावेश न झाल्याने अनेक योजनांपासून या गावांना वंचित राहण्याची वेळ आलेली आहे.

याबाबत प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या वंचित गावांचा महसूल विभागात समावेश करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. (Villages in Deola taluka deprived of revenue status warning to boycott elections Nashik News)

श्रीरामपूर, खुंटेवाडी व विजयनगर (ता. देवळा) गावांचा महसूल विभागात समावेश नसल्याने या गावांना अद्याप ऑनलाइन प्रणालीतील एलजीडी पोर्टलवर मॅप न झाल्याने ई. ग्रामस्वराज पोर्टलवर ग्रामपंचायत प्रोफाइल अपडेट करता येत नसून १५ व्या वित्त आयोगाचा निधीचा खर्च करण्यात मर्यादा पडत असतात.

या तीनही गावात स्वतंत्र ग्रामपंचायत असूनही महसुली गावांच्या यादीत सदर गावांचा उल्लेख नसल्याने याबाबत ग्रामस्थांमध्ये मोठा रोष आहे. यामुळे लाभाच्या योजनांचा लाभ मिळण्यास व नागरी सुविधा मिळवण्यात अडचणी निर्माण होत असतात.

ज्या गावांत स्वतंत्र ग्रामपंचायत नाही त्या गावांची नावे महसुली गावांच्या यादीत आहेत, आणि या गावांमध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत असूनही महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे हे गाव महसुली गावांच्या यादीत नसल्याची खंत येथील ग्रामस्थांनी बोलून दाखविली आहे.

महसुली गाव म्हणून श्रीरामपूर, खुंटेवाडी, विजयनगर या गावाचा उल्लेख नाही आणि तसा तो व्हावा याबाबतचे ठराव करून यापूर्वीच प्रशासनाकडे पाठविण्यात आले असून याबाबत पाठपुरावा करूनही अद्याप या गावांचा समावेश महसूल गाव म्हणून झालेला नाही.

विकासकामांना अडथळा

श्रीरामपूर ग्रामपंचायतीची १९६६ तर खुंटेवाडी ग्रामपंचायतीची १९६७ साली तर विजयनगर ग्रामपंचायतीची १९७६ साली स्थापना झालेली आहे. मात्र अद्यापही महसूल विभागात या गावांचा समावेश नाही.

त्यामुळे या गावांना १५ व्या वित्त आयोगाकडून दहा लाखांच्या दरम्यान निधी मिळत असतो. परंतु महसुली गावे नसल्याने खर्च करण्यास अडचणी निर्माण होतात. यामुळे गावाच्या विकासकामांत अडथळा निर्माण होतो.

"महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे ही गावे महसुली गावांच्या यादीत नाहीत. महसुली गाव म्हणून खुंटेवाडी गावाचा उल्लेख व्हावा असा ठराव करत वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र त्यास वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या. या गावांचा समावेश महसुली गावे म्हणून न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्काराचे अस्त्र उपसले जाईल."

- भाऊसाहेब पगार, माजी सरपंच खुंटेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT