Mandabai Veljali esakal
नाशिक

Nashik News: पिसाळलेल्या लांडग्याच्या हल्ल्यात महिला जखमी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शेतात काम करत असलेल्या महिलेवर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला करून तिच्या हाताला चावा घेतल्याची घटना सिन्नर तालुक्यातील वावी येथे शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. (Woman injured in mauled wolf attack Nashik News)

वावी येथील निंबोणीचा मळा परिसरात राहणाऱ्या मंदाबाई संपत वेलजाळी या दुपारी बारा वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतात काम करत होत्या. त्यांच्या आजूबाजूला घरातील इतर माणसे होती.

सौ. वेलजाळी यांच्यापासून काही अंतरावर दबा धरून बसलेल्या लांडग्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात उजव्या हाताला चावा घेत त्यांना रक्तबंबाळ केले. बाजूला काम करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड केल्यावर लांडग्याने सौ. वेलजाळी यांचा हात सोडला. व मदतीला आलेल्यांवर आक्रमकपणे तो धावून गेला.

मात्र लाठ्या काठ्या बघून त्याने धूम ठोकली. जखमी अवस्थेतील सौ. वेलजाळी यांना गावातील खाजगी दवाखान्यात आणण्यात आले. मात्र जखम मोठी असल्याने व पिसाळलेल्या लांडग्याने चावा घेतलेला असल्याने त्यांना वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तेथे प्रथमोपचार केल्यावर शासकीय रुग्णवाहिकेतून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. यांच्या हाताला जवळपास 14 टाके घालण्यात आले.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून पिसाळलेला लांडगा परिसरात फिरत आहे. या लांडग्याने अनेक दुचाकीस्वारांवर देखील हल्ल्याचा प्रयत्न केला. तसेच एक-दोन कुत्र्यांवर हल्ला करून जखमी केले आहे.

हा लांडगा पिसाळलेला असल्याने तो कळपापासून बाजूला पडला आहे. या लांडग्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT