Jalgaon Crime News : माझ्यासोबत लग्न कर; नकार दिला तर... म्हणत युवकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

youth molested minor girl jalgaon crime news
youth molested minor girl jalgaon crime newsesakal
Updated on: 

Jalgaon Crime News : माझ्यासोबत चल, आपण लग्न करू. नकार दिला तर तुझ्या अंगावर ॲसिड टाकेन, अशी धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या युवकास पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी युवकास अटक केली आहे. (youth molested minor girl jalgaon crime news)

सलीम पिंजारी असे अटक केलेल्या युवकाचे नाव असून, तो शहरातील १४ वर्षीय विद्यार्थिनीचा ती शाळेत ये-जा करताना सतत पाठलाग करत असे. एकांत साधून प्रेमाची मागणी घालत होता.

गेल्या दोन दिवसांपूर्वी विद्यार्थिनीला एकांतात गाठत माझ्यासोबत चल, आपण लग्न करू, नाही तर तुझ्या अंगावर ॲसिड टाकेन, अशी धमकी देऊन संशयिताने लज्जास्पद वर्तन केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

youth molested minor girl jalgaon crime news
Jalgaon Crime News : अनाथांच्या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार; एरंडोल तालुक्यातील प्रकार

त्यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनी प्रचंड घाबरली. तिने झाला प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली.

त्या आधारे पोलिसांनी पॉस्को व ॲट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून सलीम पिंजारी यास अटक केली आहे. उपअधीक्षक धनंजय येरूळे, पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी मनोहर नाईक तपास करत आहेत.

youth molested minor girl jalgaon crime news
Jalgaon Crime News : चिंग्या टोळी-माने बंधूविरुद्ध गुन्हा दाखल; पिस्तूल काडतुसांसह संशयित गजाआड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

फलटण  : भुताची भीती दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक  संशयिताला अटक, पॉक्सोसह जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा
POCSO Case In Nagpur Young Man Booked After 17 Year Old Girl Alleges Sexual Assault And Threats
Satara 17-year-old girl death case
Ambernath Crime
Marathi News Esakal
www.esakal.com