Nashik news esakal
नाशिक

नाशिक : पत्रकार हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून कामकाज

संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : येथील पत्रकार शंकर वाघ यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून संशयितांना अटकेसाठी होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ मालेगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले. संघाने गुरुवारी (ता. २३) अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांना मागणीचे निवेदन सादर केले.

निवेदनात पत्रकार वाघ गर्दीचे वृत्तांकन करतांना त्यांना विक्की पाटील व पप्पू कासवे आदींसह १५ ते २० जणांनी हल्ला करत मारहाण केली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होवून आठ दिवस उलटले असताना पोलिस निरीक्षक संजय गायकवाड व सहकाऱ्यांनी संशयितांना अटक केलेली नाही. तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक प्रदीप जाधव यांची तपासाकामी दिरंगाई संशयास्पद आहे. याउलट संशयित शहरात बिनधास्त फिरताना आढळून येत आहेत. पोलिस हल्लेखोरांना अटकपूर्व जामीनासाठी वेळ देत आहेत की काय, असा संशय येत आहे. पत्रकार संघाने गुरुवारी तातडीची बैठक घेऊन अपर जिल्हाधिकारी पाटोळे यांना निवेदन सादर केले. संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

शिष्टमंडळात संघाचे अध्यक्ष प्रल्हाद बोरसे, सचिव हेमंत शुक्ला, प्रमोद सावंत, बिपीन बागुल, ब्रिजमोहन शुक्ला, जहुर खान, शफीक शेख, शंकर वाघ, सुदर्शन पगार, हेमंत धामणे, मगनसिंग पाटील, अतुल शेवाळे, मनोहर शेवाळे, मुजम्मील इनामदार, निलेश शिंपी, नरेंद्र देसले, खलील अब्बास आदी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

karj mafi 2026 : कर्जमाफीची घोषणा झाली... पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी? अंमलबजावणीवर मोठे प्रश्न उपस्थित

Chandrakant Patil : नीट पेपरफुटीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांचं 'आंबा चोरी'चं उदाहरण; विरोधकांकडून जोरदार टीका

Live Updates Marathi : मारहाण प्रकरणात वकिलांची बाजू समोर, स्वसंरक्षणासाठीच प्रतिकार केल्याचा दावा

डोहाळे जेवणादिवशी सायलीला अटक; गंभीर आरोप, महीपतची एंट्री, 'ठरलं तर मग'चं कथानक बदलणार, प्रोमो पाहून प्रेक्षक शॉक

Mumbai Local Megablock: रविवारी सर्व रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, अनेक लोकल रद्द; कसे असेल वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT