Death News esakal
नाशिक

अंगावर भिंत कोसळून युवकाचा जागीच मृत्यू

रणधीर भामरे

वनोली (जि. नाशिक) : येथे काल सायंकाळी अंगावर भिंत कोसळल्याने विवेक मंगेश भामरे (वय -१५) या युवकाचा जागीच मृत्यू झाला.

गत तीन दिवसापासून पाऊस झाल्याने घराच्या भिंती ओल्या झाल्या. घरात अभ्यास करत असलेला युवक भीतीला पाठ टेकून बसलेला असताना अचानक भिंत अंगावर कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मंगेश भामरे यांनी एकुलता एकच मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दुसऱ्या ठिकाणी घराचे काम सुरु असल्यामुळे आई वडील त्या ठिकाणी होते. घरात विवेक एकटाच अभ्यास करत होता.घराची भिंत कोसळल्याचा आवाज आल्याने शेजारील आजी आजोबा व काका यांनी लगेच धाव घेतली. घरातील वीजपुरवठा बंद झाल्यामुळे अंधारात विवेक ढिगाऱ्यात अडकल्याचे दिसून आले नाही. अर्ध्या तासाने आई वडील जेव्हा घरी पोहोचले तेव्हा त्यांनी विवेकचा तपास केला.

विवेक कुठेच आढळून न आल्यामुळे भिंतीचा ढिगारा बाजूला केला असता विवेकचा मृतदेह तिथे आढळून आला. विवेकचा मृतदेह बघून आई वडील व शेजारी राहणाऱ्या आजी आजोबा व काकाने एकच हंबरडा फोडला. त्यास तत्काळ सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. आई वडील यांच्यासाठी म्हातारपणात आधार असणाऱ्या विवेकचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सकाळी सटाना येथील ग्रामीण रुग्णालयात विवेकचे शव विच्छेदन करण्यात आले व ११ वाजता अंत्यविधी करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT