रिक्षावर झाड कोसळल्याने चालकासह प्रवाशी महिलेचा मृत्यू | Latest Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

रिक्षावर झाड कोसळल्याने चालकासह प्रवाशी महिलेचा मृत्यू

नाशिक : त्र्यंबक रोडवरील ITI सिग्नल जवळ चालत्या रिक्षावर गुलमोहराचे वृक्ष उन्मळून पडल्याने चालकासह प्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.

हेही वाचा: राष्ट्रीय महामार्गावर 5 महिन्यात 94 अपघात

पोपट सोनवणे व शैला पटणी असे मयत यांची नावे आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली व रिक्षात अडकलेल्या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. मात्र डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. ही रिक्षा शहरातून सातपूरकडे निघाली होती. चालत्या रिक्षेवर अचानक झाड पडल्याने दोघांनाही जीव गमवावा लागला आहे. मान्सूनपूर्व काम पूर्ण न केल्याने हा अपघात घडला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी या वेळी केला.

हेही वाचा: राष्ट्रीय महामार्गावर 5 महिन्यात 94 अपघात

Web Title: 2 People Death On The Spot Due To Tree Collapses On The Rickshaw Iti Signal In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikaccidentdeath
go to top