Murder  esakal
नाशिक

नाशिक : अज्ञात टोळक्याने केली युवकाची गळा चिरून हत्त्या

कंठच कापला गेल्याने तो पोलिसांना काहीही सांगू शकला नाही.

नरेश हाळणोर

नाशिक : अंबड शिवारातील संजीव नगरमध्ये मंगळवारी रात्री चार-पाच जणांच्या टोळक्याने एका युवकावर हल्ला करीत त्याचा गळा चिरून हत्त्या केली. घटनेनंतर संशयित पसार झाले तर गंभीर जखमी युवक बराचवेळ जागेवर पडून राहिला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान अंबड हद्दीत गेल्या दोन महिन्यातील खुनाची हि चौथी घटना आहे, 

सदर आलम शब्बीर शेख (१९, रा. मूळ रा, दरभंगा, बिहार) असे मयत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड लिंक रोडवरील संजीवनगर येथे यात्रा होती. मंगळवारी (ता,५) रात्री ९-१०च्या दरम्यान सदरे आलम याच्यावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. यावेळी संशयितांपैकी एकाने आलमच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. यात त्याच्या गळ्यावर खोलवर जखम झाल्याने तो जागेवरच कोसळला. तर संशयित पसार झाले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी आलमला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.

...तर तो वाचला असता

आलमवर वार झाल्यानंतर तो जागेवर कोसळला. यात त्याचा कंठच कापला गेला होता, रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. पण त्याच्या मदतीसाठी जमावातून कोणी पुढे आले नाही. पोलीस येईपर्यंत बराच वेळ गेल्याने त्याचा रक्तश्रावही बराच झाला. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे कंठच कापला गेल्याने तो पोलिसांना काहीही सांगू शकला नाही, त्यामुळे संशयिताविषयी काहीही माहिती पोलिसांना मिळू शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

SCROLL FOR NEXT