tushar kale esakal
नाशिक

नाशिक : तरुणावर प्राणघातक हल्ला; चहाच्या टपरीवरील प्रकार

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिक शहर व पुर्व भागातील लगतच्या काही गावांत वाढती गुन्हेगारी (crime) पोलिसांना (nashik police) आव्हान देणारी ठरते आहे. छोट्या मोठ्या गोष्टींवरून जीवे मारणे म्हणजे शुल्लक बाब झालेली दिसून येते. त्यात तुल्यबळ पोलीस, सणवार व इतर ड्युट्यांमधे तेही भरडले जात असल्याचे चित्र दिसून येते. गुरूवार (ता.२६) सायंकाळी एका तरुणावर चाकूने झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यातील आरोपी हे तरूण असल्याने, आजची तरुणाई कुठे भरकटत चालली आहे हे अभ्यासणे गरजेचे बनले आहे.

काय घडले नेमके?

नाशिकच्या म्हसरूळ भागात तुषार काळे या तरुणावर गुरुवार (ता.२६) रोजी सायंकाळी प्राणघातक हल्ला झाला. हा हल्ला आर टी ओ कॉर्नर - रासबिहारी लिंक रोडलगतच्या चहाच्या टपरीवर घडला. या हल्ल्यात संशयित आकाश काळेने तुषारच्या डाव्या मांडीत चाकू मारला. हा हल्ला केवळ चहा टपरी लावण्यावरून झालेल्या वादातून झाल्याचे समजते. हल्ला झाल्यावर तुषारला त्वरीत खाजगी रुग्णालयात दाखल केले. या उपचांरादरम्यान तुषारचा मृत्यु झाला. या प्रकरणी संशयित आकाश काळेला म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT