death  esakal
नाशिक

Nashik News : स्पर्धा परीक्षेच्या नैराश्‍यातून तरुणाची आत्महत्या!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आलेल्या तणाव आणि नैराश्यातून २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. करिअरसाठी धडपडणाऱ्या तरुणाच्या आत्महत्येने पाथर्डी फाटा परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. (Youth commits suicide due to competitive exam tension nashik news)

शुभम भास्कर महाजन (२२, रा. बिल्डिंग नंबर २, पोलिस वसाहत, पाथर्डी फाटा) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुभम गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत होता. आयोगाचा एक पेपर दिला असता, तो पेपर त्याला अवघड गेल्याचे समजते.

अभ्यास करताना तणाव येत असल्याचे त्याने घरी कळत-नकळत सांगितले होते. दरम्यान, शुभमने शनिवारी (ता. ८) सायंकाळी राहत्या घरी असताना हॉलमध्ये बेटशीटच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. माहिती कळताच महेश कचरे यांनी इंदिरानगर पोलिसांना घटना कळविली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

इंदिरानगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे, सहायक उपनिरीक्षक चव्हाण व हवालदार गारले घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत शुभम याचे वडील रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे. त्याची बहिण विवाहित असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात अंमलदार आहे. पाथर्डी फाटा येथील पोलिस वसाहतीत तो बहिणीकडे आई-वडिलांसह राहत होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार गारले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT