Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News : वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची धावपळ

जिल्हा रूग्णालयात गत १५ दिवसात १५० हून अधिक प्रमाणपत्रासाठी अर्ज

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या कर्मचारी बदल्यांचे वेळापत्रक जाहीर होताच कर्मचारी वर्गाकडून बदल्यांची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. सोईची ठिकाणी बदली मिळावी, यासाठी कर्मचारी वर्गाकडून वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेत असल्याचे यापूर्वी निर्देशनास आले आहे.

कदाचित, त्यामुळेच की काय वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी झाली आहे. गत १५ दिवसात जिल्हा रूग्णालयात १५० हून अधिक वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी अर्ज आल्याचे वृत्त आहे. (Zilla Parishad employees rush for medical certificate Nashik ZP News)

नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाने गत आठवड्यात कर्मचारी बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १६ ते १९ मे दरम्यान ही बदली प्रक्रीया पार पडणार आहे. तीन वर्ष बदली प्रक्रीया न झाल्याने यंदा बदली प्रक्रीया होणार अशी माफक अपेक्षा कर्मचाऱ्यांची आहे.

त्यामुळे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी बदल्यांची तयारी सुरू केली आहे. या बदली प्रक्रियेत प्रामुख्याने मुख्यालयाबाहेर बदली होऊ नये, यासाठी काही कर्मचाऱ्यांचा आग्रह असतो. त्यासाठी या कर्मचारी वर्गाकडून कर्मचारी संघटनेचा तर काही कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेतला जातो.

यात दुर्धर आजार दाखवून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविले जाते अन मुख्यालयात अथवा नाशिक शहरा लगत बदली करून घेतली जाते. यामध्ये दुर्धर आजार असलेले कर्मचारी आहेत. त्यांना प्रमाणपत्राची गरज असते.

बदली प्रक्रियेत अनेकदा कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवीत सोईच्या बदल्या करून घेतलेल्या आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी देखील झाल्यात. त्यावर प्रमाणपत्रांची पडताळणीचा निर्णय झाले मात्र, पुढे त्यावर काहीही झालेले नाही. यंदाही कर्मचारी बदल्यांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी जिल्हा रूग्णालयात गर्दी झाली असल्याचे बघावयास मिळत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्रमाणपत्रांची पडताळणी

जिल्हा शासकीय रुग्णालयातून आंतरजिल्हा बदलीसाठी काही पोलिस अंमलदारांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविल्याचे प्रकरण राज्यभर गाजले. सदर प्रकारामुळे सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय झाला होता.

याच अनुषंगाने तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले होते. मात्र, बनसोड यांची बदली झाल्याने ही पडताळणी झाली नाही.

मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ज्या कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केले आहे. त्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागास दिलेले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव पडताळणीसाठी गेले. मात्र, काय झाले याबाबत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT